Maratha Reservation : सोलापूर जिल्ह्यात ठिकठिकाणी साखळी उपोषण | पुढारी

Maratha Reservation : सोलापूर जिल्ह्यात ठिकठिकाणी साखळी उपोषण

उत्तर सोलापूर : पुढारी वृत्तसेवा – मराठा उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणासाठी सरकारला ४० दिवसांची मुदत दिल्यानंतरही अद्याप मराठा समाजाला आरक्षण जाहीर झाले नाही. मुदत संपल्याने जरांगे पाटील यांनी पुन्हा आंतरवाली सराटी () येथे दि. २६पासून बेमुदत उपोषण सुरु केले आहे. मराठा आरक्षण मागणी व उपोषणकर्ता मनोज जरांगे-पाटील समर्थनार्थ नान्नज (ता. उत्तMaratha Reservationर सोलापूर) येथे सकल मराठा समाज बांधवाच्यावतीने (दि. २७ शुक्रवार) महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करत उपोषण करण्यात आले. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत मनोज जरांगे पाटील समर्थनार्थ शांततेत साखळी उपोषणाला करण्यात येणार आहे. (Maratha Reservation)

‘एक मराठा लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचं, कोण म्हणतय देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही, अशा घोषणा मराठा समाज बांधवां कडून देण्यात आल्या. गावात राजकीय पक्षाच्या नेत्यांना प्रवेशबंदी करण्यात आल्याचा ठराव घेण्यात आला आहे. तत्पूर्वी गुरुवारी रात्री गावातून स्टँड परिसर, शिवाजी चौक, माळी गल्ली, गणपती मंदिर, गवळीवस्ती मार्गावरुन कँडल मार्च काढण्यात आले. यावेळी अशोक गवळी, लक्ष्मण मुळे, तात्या साहेब कादे, भारत बोंगे, सुनील भोसले, सुशिल गवळी, संभाजी दडे, दीपक अंधारे, हणमंत टोणपे, प्रमोद गवळी, विशाल भोसले, श्रीकांत मुळे, जगन्नाथ भोरे, संजय मुळे, वैभव मुळे, दिलीप माने, शिवाजी गवळी, निलेश गवळी, सतीश पाटील, वैभव घोडके, भागवत मुळे, राज मुळे, महादेव गवळी, लहू मुळे, भारत तात्या गवळी, विनोद माने, किसन परांडकर, विजय गरड, लक्ष्मण मुळे, अभिमन्यू गवळी, विष्णू मुळे उपस्थित होते.

सांगोल्यात धरणे आंदोलन

सांगोला : छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे साखळी उपोषण व धरणे आंदोलन सुरू केले आहे. सांगोला तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने शुक्रवारपासून बेमुदत साखळी उपोषण व धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याबाबतचे निवेदन सांगोला तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने तहसीलदार यांचेकडे गुरुवारी देण्यात आले. सांगोला तहसीलदार यांना देण्यात आलेल्या सदर निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, “मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मराठा योद्धा मनोज जरांगे -पाटील यांनी सुरु केलेल्या आंदोलनास पाठींबा देण्यासाठी तसेच सकल मराठा समाज, महाराष्ट्र राज्य यांचेकडील आव्हानास प्रतिसाद देत, सांगोला तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने आज शुक्रवार पासून सांगोला शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत बेमुदत साखळी उपोषण व धरणे आंदोलन करण्यात येत आहे. त्याचबरोबर, मराठा समाजाच्या आरक्षणाची बाजू मांडणे व शासनाचा निषेध करणे, या अनुषंगाने वेगवेगळ्या पद्धतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. सांगोला शहर व तालुका मराठा सकल समाजाच्यावतीने सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत बेमुदत साखळी उपोषण व धरणे आंदोलन करण्यात येत आहे. (Maratha Reservation)

मोडनिंब येथे बेमुदत साखळी उपोषण

मोडनिंब : मोडनिंब ग्रामपंचायत कार्यालयासमोर आज साखळी उपोषणास सुरुवात करण्यात आली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून तसेच एक मराठा लाख मराठा मराठ्यांना आरक्षण दिलेच पाहिजे, या संदर्भातील घोषणा देत साखळी उपोषण सुरू करण्यात आले.

मनोज जरांगे पाटील यांना अटक करा, अशी मागणी करणाऱ्या गुणरत्न सदावर्ते यांच्या प्रतिमेचे निषेध म्हणून दहन करण्यात आले. यावेळी निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. गाव बंदी असताना राजकीय पुढाऱ्यांना प्रवेश नव्हता याबाबत सकल मराठा समाजाने पत्रही संबंधितांना दिले होते तरी देखील आमदार बबनदार बबनराव शिंदे यांनी मोडनिंब येथे बँक शाखेच्या उद्घाटन प्रसंगी हजेरी लावल्याने उपोषण स्थळी असलेल्या सर्वांनीच त्यांच्या भाषणातून आमदार शिंदे यांचा तीव्र निषेध व्यक्त केला.

प्रशांत गिड्डे, संतोष पाटील, प्रकाश गिड्डे, सौदागर जाधव, व्ही. के. पाटील, बाबुराव सुर्वे यांच्यासह उपोषणात सहभागी झालेल्या अनेकांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले.

जाधववाडी बैरागवाडी आरण मोडनिंब यासह अनेक गावातील सकल मराठा समाजाने कोणत्याही राजकीय पक्षाचा अन्य गावातील प्रतिनिधी गावात येऊ नये कोणतीही सभा तसेच कार्यक्रम घेऊ नयेत याबाबत गावाच्या दर्शनी भागात फलक लावले आहेत. या नियमाचे उल्लंघन केल्यास त्यांना कायदेशीर बाबींना समोर जावे लागेल अशा प्रकारचा इशारा यावेळी सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आला.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रशांत गिड्डे, काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस सौदागर जाधव, मोडनिंब तंटामुक्त समितीचे अध्यक्ष प्रकाश गिड्डे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत कोणत्याही कार्यक्रमास आम्ही हजेरी लावणार नाही तसेच कार्यक्रम घेणार नाही असे त्यांनी यावेळी जाहीर केले. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, मोडनिंब ग्रेन मर्चंट असोसिएशन आणि मोडनिंब सकल जैन समाज यांच्या वतीने साखळी उपोषणास लेखी पाठिंबा देण्यात आला.

राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी आणि मतदानावर बहिष्कार ग्रामपंचायतीचा ठराव

ओबीसी प्रवर्गातून मराठ्यांना आरक्षण मिळेपर्यंत येणाऱ्या सर्व निवडणुकांवर बहिष्कार टाकण्यात आला आहे. राजकीय पुढार्‍यांना गावबंदी करण्यात आली आहे. गावात राजकीय सभा घेऊ नये, याबाबत मोडनिंब ग्रामपंचायतीने ठराव केला आहे.

Back to top button