जातनिहाय जनगणना झाली पाहिजे, त्यासाठी सरकारचीही तयारी; अजित पवारांचे मोठे विधान | पुढारी

जातनिहाय जनगणना झाली पाहिजे, त्यासाठी सरकारचीही तयारी; अजित पवारांचे मोठे विधान

मोडनिंब : पुढारी वृत्तसेवा जातनिहाय जनगणना व्हावी, अशी माझी मागणी आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च होणार असून यासाठी आमची तयारी आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी दिली. सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम शुभारंभ आणि शेतकरी मेळाव्याप्रसंगी उपमुख्यमंत्री पवार बोलत होते.

पवार म्हणाले, की राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी सरकार कटिबद्ध आहे. अनेक प्रश्न सोडवणे गरजेचे आहे. राज्यातील शेती, उद्योग, आरोग्य, मराठा आरक्षण, जातनिहाय जनगणना यांसह सर्वच प्रश्न सोडवण्यासाठी सतत सकारात्मक प्रयत्न सुरू आहेत. सत्तेवर नसलेले आमची बदनामी करतात. आम्ही आमच्याकडील संस्था नंबर एकने चालवतो. चांद्यापासून बांध्यापर्यंतचा विकास व्हावा, अशी माझी इच्छा नेहमीच असते.

सकल मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकार पूर्णपणे सकारात्मक आहे. आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकावे, अशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि राज्य सरकारची भूमिका आहे. मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे-पाटलांच्या भूमिकेला आपला पाठिंबा आहे.
– अजित पवार, उपमुख्यमंत्री

हेही वाचलंत का?

Back to top button