सोलापूर : भिगवन पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात | पुढारी

सोलापूर : भिगवन पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात

सोलापूर : अमोल व्यवहारे गुन्ह्यातील कागदपत्रे देण्यासाठी 30 हजार रुपये लाचेची मागणी करुन 20 हजार रुपये लाच स्वीकारताना पुणे ग्रामीण पोलीस दलातील भिगवन पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक आणि वकील यांना पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहाथ पकडले. पुणे एसीबीच्या पथकाने ही कारवाई भिगवन पोलीस ठाण्याच्या समोर (रविवार) केली आहे. लोकरे हे मुळचे सोलापूरचे असून, काही महिन्यांपूर्वी त्यांची पुणे ग्रामीण येथे बदली झाली होती.

भिगवन पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक प्रवीण सुग्रीव लोकरे (वय 53) आणि अॅड. मधुकर विठ्ठल कोरडे (वय 35 रा. अहमदनगर) असे लाच – घेताना पकडण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. याबाबत 41 वर्षाच्या व्यक्तीने पुणे एसीबीकडे तक्रार दिली आहे. तक्रारदार यांच्या वडिलांचे अपघाती निधन झाले आहे. त्यांना धडक देणाऱ्या वाहनाची इन्शुरन्सची कागदपत्रे व दाखल गुन्ह्यातील इतर कागदपत्रे देण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक प्रवीण लोकरे व अॅड. मधुकर कोरडे यांनी 30 हजार रुपये लाचेची मागणी केली. तडजोडी अंती 20 हजार रुपये देण्याचे ठरले. तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी पुणे एसीबी कार्यालयात तक्रार केली. तक्रारदार यांना कागदपत्रे देण्यासाठी भिगवन पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक प्रवीण लोकरे व अॅड. कोरडे यांनी 30 हजार रुपये लाच मागून तडजोडी अंती 20 हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केले.

पथकाने रविवारी भिगवन पोलीस स्टेशन समोर सापळा रचला. अॅड. कोरडे यांना पीएसआय लोकरे यांच्यासाठी 20 हजार रुपये लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. तर पीएसआय लोकरे यांनी लाच स्वीकारण्यास प्रोत्साहन दिले. दोघांना एसीबीच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्यावर भिगवन पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा :

Back to top button