

सोलापूर; पुढारी वृत्तसेवा : राज्यातील राजकीय धुळवडीचा वीट आला निवडणुकीत आहे. आगामी आघाडीसोबत जाणार नाही. मात्र स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वतंत्र निवडणूक लढविणार असल्याचे मत माजी खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केले. बुधवारी शेट्टी हे सोलापूर दौऱ्यावर आले होते. त्यांनी शासकीय विश्रामगृहात बोलताना स्वाभिमानी शेतकरी संघटना कोणत्याही पक्षासोबत जाणार नसल्याचे स्पष्ट केले.
यावेळी जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते. शेट्टी म्हणाले, की सत्तेसाठी विविध पक्षांत फूट पडत कोणत्याही आहे. राज्यात सध्या सुरू असलेल्या घडामोडीमुळे नागरिक वैतागले आहेत. येणाऱ्या काळात देशासह राज्यात बदल घडणार आहे. इंग्रजांनी देशावर दीडशे वर्षे राज्य केले. महात्मा गांधी यांनी त्यांना विरोध केल्यामुळे ते देशातून हद्दपार झाले. त्यामुळे आता सत्तेत असणाऱ्या पक्षालाही सत्तेतून घालवण्यासाठी नागरिकांनी एकत्रित आल्यास सत्ता जाण्यास वेळ लागणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
प्रहार शेतकरी संघटनेचे नेते तथा आमदार बच्चू कडू हे माझे जुने मित्र आहेत. त्यांनी आगामी निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेसोबत यावे. ते आले तर येणाऱ्या सर्व निवडणुका एकत्रित लढवू. कडू यांनी सत्ता सोडून स्वाभिमानी शेतकरी संघटनेसोबत यावे, असे आवाहन शेतकरी संघटनेचे नेते शेट्टी यांनी केले.
हेही वाचा :