श्रावण मासानिमित्त शिवयोगी श्री सिध्देश्‍वर मंदिरात जय्यत तयारी | पुढारी

श्रावण मासानिमित्त शिवयोगी श्री सिध्देश्‍वर मंदिरात जय्यत तयारी

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा : श्रावणमासाला गुरुवारपासून प्रारंभ होत आहे. श्रावणमासानिमित्त शिवयोगी श्री सिध्देश्‍वर मंदिरात भजन, कीर्तनासह विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दर्शनासाठी येणा-या भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी मंदिर समितीकडून तयारी करण्यात आली आहे.

श्रावणात चारही सोमवारी योगसमाधीली आकर्षक फुलांची सजावट करण्यात येते. दर सोमवारी गाभार्‍यात अक्कीपूजा करण्यात येणार असून तिसर्‍या श्रावणी सोमवारी जिल्हातील विविध भागातील पालख्या मंदिरात येतात. शेवटच्या म्हणजेच चौथ्या सोमवारी मंदिर परिसरातील आदिलिंगेश्वराला तुपाचा अभिषेक करून सिद्धरामांची पालखी मिरवणूक काढण्यात येते, असे पुजारी गुरूराज हब्बू यांनी माहिती दिली.

संपूर्ण मंदिरा परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. सिध्देश्‍वरांच्या दर्शनासाठी हजारो भाविक येत असतात. गर्दीमुळे अनेकांना गाभार्‍यात जाणे शक्य होत नाही. अशा भक्तांसाठी गाभान्यातील आरतीचे थेट प्रक्षेपण डिजिटल स्क्रीनद्वारे दाखवण्याची सोय करण्यात आली आहे. दर्शनासाठी आलेल्या भाविकांची गैरसोय होऊ नये. यासाठी मंदिरात स्त्री आणि पुरुष भाविकांसाठी स्वतंत्र रांगा उभारण्यात आले आहे. यासाठी सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटी, हब्बू परिवारातील सदस्यांसह विविध सामाजिक संस्थामधील विद्यार्थी – विद्यार्थींनी सेवा बजावणार आहे.

नित्य पुजा कार्यक्रम

पहाटे 5 वाजता काकडा आरती, सकाळी साडेसात वाजता योगसमाधीस रुद्राभिषेक, सकाळी साडेआठ वाजता सामूहिक जप, सकाळी 9 वाजता रुद्राभिषेक आणि आरती, त्यानंतर योगसमाधी आणि गाभार्‍यात महापूजा, रात्री 9 वाजता पालखी परिक्रमा होणार आहे.

Back to top button