सोलापूर : प्रेयसीबरोबर हॉटेलात आलेल्या तरूणावर जमावाकडून हल्ला | पुढारी

सोलापूर : प्रेयसीबरोबर हॉटेलात आलेल्या तरूणावर जमावाकडून हल्ला

सोलापूर, पुढारी वृत्तसेवा : समाज माध्यमांवर आक्षेपार्ह स्टेटस ठेवणे. कथित लव्ह जिहादच्या नावाखाली किंवा गोहत्येच्या संशयावरून झुंडीने हल्ले करणे. शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मारहाण करणे यासारखे प्रकार सोलापुरात वाढले असताना त्यात आणखी एका घटनेची भर पडली आहे. सोलापुरात प्रियसीबरोबर जेवण करण्यासाठी एकत्र आले असता भिन्नधर्मीय असल्याच्या संशयावरुन जमावाने त्यांना बेदम मारहाण केली.  झुंडीच्या हल्ल्यातून तरूणाला वाचविणा-या काही कार्यकर्त्यांनी ही बाब पोलिसांच्या निदर्शनास आणून दिली. मात्र, पोलिसांनी दाद न देता उलट त्या कार्यकर्त्यांनाच उद्देशून जातीवाचक भाषा केल्याची तक्रार संबंधित कार्यकर्त्यांच्या संघटनेने पोलीस आयुक्त राजेंद्र माने यांच्याकडे केली आहे.

याबाबत अधिकची माहिती अशी की, दक्षिण सोलापूर तालुक्यात एकाच गावात राहणारे आणि विवाहीत असलेले भिन्नधर्मीय प्रेमीयुगुल सोलापुरात छत्रपती शिवाजी महाराज चौकाजवळील एका हाटेलात जेवण करण्यासाठी आले होते. तेव्हा अचानकपणे धुडघूस घालत तरूणांची झुंड तेथे आली आणि उन्मादाच्या घोषणा देत, संबंधित प्रियकर तरूणाला बेदम मारहाण करायला सुरूवात केली. नंतर त्या तरूणाला हॉटेलातून बाहेर काढत पुणे रस्त्यावर बाळेनजीक पुलाखाली पळवून नेऊन पुन्हा बेदम मारहाण केली गेली. सुदैवाने तेथून जाणा-या तरुणांनी कार्यकर्त्यांनी त्या तरूणाची हल्ल्यातून कशीबशी सुटका केली.

हेही वाचलंत का?

Back to top button