सोलापूर : मनपाच्या तीन अधिकार्‍यांवर अ‍ॅट्रॉसिटीसह विनयभंगाचा गुन्हा | पुढारी

सोलापूर : मनपाच्या तीन अधिकार्‍यांवर अ‍ॅट्रॉसिटीसह विनयभंगाचा गुन्हा

सोलापूर; पुढारी वृत्तसेवा : रस्त्याच्या कामावरील दगड उडून लागल्याने त्याची तक्रार करणार्‍या महिलेला जातिवाचक शिवीगाळ करून तिचा विनयभंग केल्याप्रकरणी महानगरपालिकेच्या तीन अधिकार्‍यांविरोधात सदर बझार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तपन डंके, रामकृष्ण कोमलु व अंबादास शिंदे अशी गुन्हा दाखल झालेल्या अधिकार्‍यांची नावे आहेत. याबाबत पीडित महिलेने फिर्याद दाखल केली आहे. 13 जुलै रोजी दुपारी तिच्या घरासमोरील सार्वजनिक रस्त्यावर सरकारी रस्त्याचे काम चालू होते. त्याठिकाणचे कामगार दगड रस्त्यावर टाकत होते. त्यावेळी घरासमोरील दोरीवर कपडे वाळत घालणार्‍या पीडितेला रस्त्यावरील दगड उडून लागल्याने पीडिता ठेकेदारास दगड लागल्याचे सांगण्यासाठी गेली होती. त्यावेळी तेथील महानगरपालिकेचे अधिकारी तपन डंके, रामकृष्ण कोमलू, अंबादास शिंदे यांनी तिला जातिवाचक शिवीगाळ करून तिच्या हाताला धरून ढकलून दिले. तसेच झोंबाझोंबी केली, असे तक्रारीत म्हटले आहे. तपास सहायक पोलिस आयुक्त मोरे करीत आहेत.

Back to top button