सोलापूर : इंजिनिअरिंग डिप्लोमासाठी 15 जुलैपर्यंत मुदतवाढ | पुढारी

सोलापूर : इंजिनिअरिंग डिप्लोमासाठी 15 जुलैपर्यंत मुदतवाढ

सोलापूर; पुढारी वृत्तसेवा : दहावीनंतरच्या इंजिनिअरिंग डिप्लोमा अभ्यासक्रमांच्या प्रवेशाचे अर्ज भरण्यास 15 जुलैपर्यंत तंत्रशिक्षण संचालनालयाने मुदतवाढ दिली आहे. विद्यार्थ्यांना कागदपत्रांअभावी प्रवेशासाठी अर्ज भरण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे ही मुदतवाढ देण्यात आली आहे.

दहावीनंतर रोजगारक्षम शिक्षणासाठी इंजिनिअरिंग डिप्लोमा हा चांगला पर्याय विद्यार्थ्यांना उपलब्ध असतो. राज्यात यंदा इंजिनिअरिंग डिप्लोमासाठी 375 संस्थांमध्ये मिळून जवळपास 1 लाख जागा आहेत. त्यासाठी अर्ज भरण्यास 1 जूनपासून सुरुवात झाली होती. ती मुदत 21 जूनला संपुष्टात आली होती. मात्र तोपर्यंत अनेक विद्यार्थ्यांचे अर्ज सादर झाले नव्हते. त्यामुळे ही मुदत 7 जुलैपर्यंत वाढविण्यात आली होती. अद्यापही अनुसूचित जाती-जमाती, इतर मागासवर्गीय, एसबीसी, ईडब्ल्यूएस, टीएफडब्ल्यूएस प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जातीचे प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र, आर्थिकद़ृष्ट्या प्रमाणपत्र, आर्थिकद़ृष्ट्या दुर्बल घटकाचे प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला ही प्रमाणपत्रे मिळण्यात अडचणी येत आहेत.

Back to top button