सोलापूर : आ. माने अजित पवारांंसोबत आ. शिंदे दोन्हींकडे! | पुढारी

सोलापूर : आ. माने अजित पवारांंसोबत आ. शिंदे दोन्हींकडे!

सोलापूर : अजित पवार 35 आमदारांच्या पाठिंब्यावर सत्तेत सहभागी झाले. या राजकीय उलथापालथीवर जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या दोन आमदारांनी संदिग्ध प्रतिक्रिया दिली आहे.मोहोळचे आमदार यशवंत माने म्हणाले, ‘मी अजितदादांबरोबर आहे तर माढा मतदारसंघाचे आमदार बबनदादा शिंदे म्हणाले, ‘मी दोन्हींकडे आहे. पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये मात्र संभ्रमाचे वातावरण आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने बोलावलेल्या बैठकीला गेलो होतो. त्यावेळी या घटना घडणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळाले. मी राष्ट्रवादीसोबतच आहे. नेमक्या कोणत्या राष्ट्रवादीसोबत असे विचाराल तर मी म्हणेन दोन्ही राष्ट्रवादी. मला केवळ मतदारसंघाच्या विकासाचा ध्यास असतो.
-आ. बबनदादा शिंदे, माढा

सध्या राज्याच्या राजकारणात सातत्याने बदलाच्या घटना, घडामोडी घडत आहेत. अशा परिस्थितीत सर्वसामान्य लोकांच्या विकासासाठी सत्तेत जाण्याचा निर्णय जर नेते अजित पवार यांनी घेतला असेल तर अजितदादांसोबत राहू.
-आ. यशवंत माने, मोहोळ

Back to top button