अशी आहे पंढरीतील श्री विठुरायाची मूर्ती | पुढारी

अशी आहे पंढरीतील श्री विठुरायाची मूर्ती

– संजय पाठक

तीर्थक्षेत्र पंढरपुरातील श्री विठुरायाची मूर्ती स्वयंभू आहे. श्री विठुरायाला श्री विष्णूचा अवतारदेखील मानला जातो. या मूर्तीवर काही प्राचीन, ऐतिहासिक, पौराणिक अशा खुणा आहेत. श्री विठुरायाच्या महापूजेप्रसंगी देवाचे केशरयुक्त कोमट पाण्याने स्नान झाल्यानंतर कोमल, मऊसूत अशा पंचाने मूर्ती कोरडी केली जाते. त्यानंतर देवाच्या कपाळी चंदनाचा एक छोटासा टिळा लावला जातो, तसेच देवाच्या मुकुटावर श्री शंभू महादेवाच्या पिंडीला लावतात तसा अर्धगोलाकार चंदनाचा गंध लावला जातो. त्यानंतर देवाचे पुजारी हातामध्ये चांदीचे मोठे निरंजन घेऊन देवाच्या अंगावरील या प्राचीन, पौराणिक खुणा भाविकांना मोठ्या आवाजात सांगतात. प्रत्येक खुणेचा उल्लेख करताना चांदीचा दीप त्या-त्या खुणेजवळ नेऊन तो अधिक चांगल्या पद्धतीने भक्तांना दिसेल, असेही यावेळी पाहिले जाते. मूर्तीच्या संवर्धनार्थ आलेल्या सरकारी निर्बंधांमुळे अलीकडे श्री विठुरायाच्या महापूजेचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे देवाच्या मूर्तीवरील खुणा सर्वांनाच माहिती असतील, असे नाही. त्या पार्श्वभूमीवर श्री विठुरायाच्या मूर्तीवरील खुणा दै. ‘पुढारी’च्या वाचकांसाठी…

अशी आहे मूर्ती

श्री विठ्ठलाला सावळ्या, काळ्या असे संतांनी संबोधले असले तरी देवाची मूर्ती ही करड्या रंगाची असल्याचे भासते. मूर्ती वालुकामय दगडाची खडबडीत अशी आहे. मूर्तीची उंची सुमारे तीन फूट नऊ इंच असावी.

vitthal

हेही वाचा : 

Back to top button