सोलापूर : आसरा भागात होणार नवे रेल्वेस्थानक

सोलापूर : आसरा भागात होणार नवे रेल्वेस्थानक

सोलापूर : मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाचे पुनर्विकासाचे काम हाती घेण्यात आले आहे. 'अमृत भारत' योजनेंतर्गत सोलापूर रेल्वेस्थानकासह कुर्डूवाडी ते कलबुर्गीदरम्यान मालवाहतुकीसाठी नवीन रेल्वेलाईन टाकण्यात येणार आहे. आसरा भागातील रेल्वेच्या जागेवर पुढीलकाळात नवीन रेल्वेस्थानक उभारण्यात येणार आहे. या स्थानकावरुन कुर्डूवाडी ते कलबुर्गीदरम्यान लोकलसेवा सुरू होणार असल्याची माहिती रेल्वेच्या सूत्रांकडून मिळाली आहे.

सोलापूर शहराचा 'स्मार्ट सिटी'मध्ये समावेश करण्यात आला. त्यानुसार शहरातील अनेक भागांत विकासाच्यादृष्टीने काम सुरू आहे. यासाठी केंद्र व राज्य शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी उपल्बध होत आहे. केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडूनदेखील विकासाच्याद़ृष्टीने पावले उचलण्यास सुरुवात झाली आहे. देशभरातील रेल्वेस्थानकांचा विकास करणे, वंदे भारत, बुलेट ट्रेन यासारख्या अत्याधुनिक रेल्वे प्रवाशांच्या सेवेसाठी देण्यात येत आहेत.

याचाच एक भाग म्हणून सोलापूर रेल्वेस्थानकाचादेखील येत्या काळात मोठ्या प्रमाणात विस्तार करण्यात येणार आहे. सध्या सोलापूर स्थानकावरील फलाट संख्येत वाढ करण्यात येणार आहे. स्थानकावर प्रवाशांच्या सेवेसाठी हॉटेल, मॉल, करमणूक सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वेकडून दर्जेदार सेवा देण्यासाठी पावले उचलण्यात येत आहेत. त्याचबरोबर कुर्डूवाडी ते कलबुर्गीदरम्यान नवीन रेल्वेलाईन टाकून या रुळांवरुन मालगाडी धावणार आहे. यामुळ प्रवासी गाड्यांना मालगाडीमुळे अडथळा निर्माण होणार नाही. प्रवासी गाड्यांना गती येईल. शहराच्या लोकसंख्येच्या तुलनेत स्थानकाचे विभाजन होणार आहे. यासाठी आसरा परिसरातील रेल्वेच्या जागेवर लवकरच नवीन रेल्वेस्थानक उभारण्यात येणार आहे. याठिकाणाहून दोन लोकल रेल्वे धावणार आहे. यामुळे जुळे सोलापूर, आसरा, होटगी रोड, नई जिंदगी परिसरातील नागरिकांची सोय होईल.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news