पंढरपूर : आषाढीसाठी उजनीतून भीमेत सोडले पाणी | पुढारी

पंढरपूर : आषाढीसाठी उजनीतून भीमेत सोडले पाणी

बेंबळे; पुढारी वृत्तसेवा :  पंढरीच्या पांडुरंगाच्या आषाढी वारीचा सोहळा 29 जून रोजी आहे. त्यासाठी उजनी धरणातून भीमा नदीत बुधवारी सकाळी 9 वाजता पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आली.

4 गाळ मोरीतून 1500 क्यूसेक्सने पाणी सोडण्यास सुरुवात केली आहे. त्यात टप्प्याटप्प्याने सायंकाळपर्यंत वाढ केली जाणार आहे. 24 तारखेला पाणी पंढरपूर येथे पोहोचेल, असे नियोजन करण्यात आले आहे. ते पाणी 29 जून रोजी बंद करणार असल्याची माहिती जलसंपदा विभागाचे सोलापूरचे अधीक्षक अभियंता धीरज साळे यांनी दिली.

10 मेपासून शेतीसाठी पाणी पुरवणारे कालवा, बोगदा, सिंचन योजना, नदी असे सर्व स्त्रोत बंद झाले असल्यामुळे व यावर्षीचा पावसाळा सुरू होऊन पंधरा दिवस होऊन गेले; परंतु जिल्ह्यात एक थेंबदेखील पावसाचा आलेला नाही.

Back to top button