सोलापूर : रस्ता क्रॉस करताना कार चालकाने मोटर सायकलस्वारास चिरडले | पुढारी

सोलापूर : रस्ता क्रॉस करताना कार चालकाने मोटर सायकलस्वारास चिरडले

मंगळवेढा, पुढारी वृतसेवा : मंगळवेढा शहरातून बायपास रोड क्रॉस करून धर्मगाव रोडने निघालेल्या एका मोटर सायकलस्वारास एका कार चालकाने जोराची धडक दिली. या अपघातात सायकलस्वार जागीच ठार झाल्याची घटना घडली. ज्ञानेश्वर नंदू घाटूळ (वय ३६) असे अपघातात मृत्यू झालेल्या सायकलस्वाराचे नाव आहे. या प्रकरणी वाहन चालक योगेश एकनाथ चांडे (रा.मुठा-तांदळी ता.मालेगाव जि.वासिम) याच्याविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.

दरम्यान,बायपास रोडला कारखाना चौकात रस्त्याच्या कोपर्‍यावर मटणाचा स्टॉल टपरी व अन्य एक टपरी असल्याने सोलापूरकडून पंढरपूरकडे व कारखान्याकडे रोड क्रॉस करताना या टपरीमुळे वाहने अजिबातच वाहनचालकास दिसत नसल्यामुळे यापुर्वी किरकोळ अपघात झाले आहेत.

हेही वाचलंत का?

Back to top button