राऊत म्हणजे बिनबुडाचं गाडगं : आमदार शहाजी पाटील

राऊत म्हणजे बिनबुडाचं गाडगं : आमदार शहाजी पाटील

सोलापूर, पुढारी वृत्तसेवा : मुळात संजय राऊत हे बारक्या खुराड्यात बसले आहेत. आता राऊत नेमक्या कोणत्या पक्षातून बोलत आहेत, त्यांना समजत नाही. राऊत बिनबुडाचे गाडगं आहे. कुठे पण गरगळत आहे, अशी टीका आमदार शहाजी पाटील यांनी केली आहे.

मिंधे गट हा भाजपने पाळलेला कोंबड्यांचा खुराडा आहे. त्यांच्यावर लवकरच महाराष्ट्र डायरी ऑफ खोका हा चित्रपट काढणार असल्याची खोचक टीका ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी शिंदे गटावर केली होती. यावरून शिंदे गटाचे आमदार पाटील यांनी राऊतांवर पलटवार केला आहे.

आमदार पाटील म्हणाले, खा. राऊत यांच्या चित्रपटाला टक्कर देण्यासाठी माकडाच्या हातात कोलित असा चित्रपट आम्ही काढणार असल्याचे आमदार शहाजी पाटील यांनी म्हटले आहे. हे खोकं खोकं म्हणून राऊत दगड हाणत फिरले. आम्हाला किती जागा मिळणार यावर राऊत यांनी बोलू नये, ते ठाकरे गटाचा बुद्धिभेद करण्याचे काम करीत आहेत असा आरोपही आ. पाटील यांनी केला आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news