सोलापुरात सूर्याचा प्रकोप; पारा 43.5 अंशांवर | पुढारी

सोलापुरात सूर्याचा प्रकोप; पारा 43.5 अंशांवर

सोलापूर; पुढारी वृत्तसेवा :  सोलापूर शहर व जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून तापमानात सातत्याने वाढ होत चालली आहे. रविवारी यंदाच्या हंगामातील 43.5 अंश सेल्सिअस इतक्या सर्वोच्च तापमानाची नोंद झाली.

यंदाच्या वर्षी सोलापुरातील कमाल तापमानाचा आकडा हा 43 अंश सेल्सिअसपर्यंत नोंदला आहे. सलग चौथ्यांदा 43 अंश
सेल्सिअस इतके कमाल तापमान यंदाच्या वर्षी नोंदण्यात आले. उन्हामुळे अनेक लोक घराच्या बाहेर पडत नाहीत. त्यामुळे बाजारपेठांसोबतच सोलापुरातील विविध मंदिरामध्ये शुकशुकाट पहावयास मिळत आहे. रविवारी कमाल तापमान 43.5 अंश सेल्सिअसवर पोहचले होते. त्यामुळे उकाड्याने नागरिक दिवसभर हैराण होते. सोलापुरात सकाळी नऊ वाजल्यापासूनच उन्हाचा पारा वाढल्याने अनेकांना उष्माघातासारख्या आजारांना सामोरे जावे लागत आहे. सायंकाळी पाचच्या सुमारास शहरातील काही भागात हलकासा पाऊस झाला तसेच ढगाळ वातावरण होते. त्यामुळे गारवा निर्माण झाल्याने शहरवासीयांना दिलासा मिळाला.

Back to top button