कर्नाटक निवडणूक : महाराष्ट्रातील सीमा भागातील नागरिकांना सुट्टी | पुढारी

कर्नाटक निवडणूक : महाराष्ट्रातील सीमा भागातील नागरिकांना सुट्टी

सोलापूर; पुढारी वृत्तसेवा :  कर्नाटकातील विधानसभेच्या निवडणुकीसाठी 10 मे रोजी मतदान होत आहे. त्यासाठी सीमा भागातील सर्वच कामगारांना या दिवशी पगारी सुट्टी देण्याच्या सूचना कामगार विभागाने दिल्या आहेत.

कर्नाटक राज्यातील जे मतदार महाराष्ट्रातील सीमा भागात असणार्‍या सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारा, उस्मानाबाद, लातूर आणि नांदेड या भागातील जिल्ह्यातील आस्थापनांमध्ये काम करत आहेत, त्या कामगारांना 10 मे रोजी सुट्टी असणार आहे. तसेच ज्या ठिकाणी सुट्टी देता येणे शक्य नाही, अशा ठिकाणी त्या मतदारांना किमान दोन तासांची सवलत देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या आदेशाने ज्या ज्या भागात हे कर्मचारी आहेत आणि ज्यांची नावे कर्नाटकातील विविध मतदारसंघांतील मतदार याद्यांमध्ये आहेत. त्या त्या लोकांना मतदान करण्यासाठी जाता यावे यासाठी हा आदेश जारी करण्यात आला आहे. याची अंमलबजावणी सर्वच आस्थापनांनी करावी, अशा सूचनाही करण्यात आल्या आहेत.

Back to top button