अकलूज : उत्तर प्रदेशच्या दिव्या कांकरान ताराराणी महिला कुस्ती केसरीच्या मानकरी | पुढारी

अकलूज : उत्तर प्रदेशच्या दिव्या कांकरान ताराराणी महिला कुस्ती केसरीच्या मानकरी

अकलूज ; पुढारी वृत्तसेवा ताराराणी महिला केसरी कुस्ती स्पर्धेत उत्तर प्रदेशच्या दिव्या कांकरानने दिल्लीच्या शिक्षाचा १ मिनिटांच्या आत गदालोड डावाने आसमान दाखवित ताराराणी महिला केसरीची चांदीची गदा व रोख १ लाख रु.पटकावले. दिव्याला छत्रपती संभाजीराजे यांच्या हस्ते बक्षिस प्रदान करण्यात आले.

अकलूज येथील विजयसिंह मोहिते-पाटील क्रिडा संकुलात ताराराणी कुस्ती केंद्र, शिवरत्न कुस्ती केंद्र व शिवरत्न शिक्षण संस्थेच्यावतीने ताराराणी महिला कुस्ती स्पर्धेचे अयोजन करण्यात आले होते. ताराराणी महिला केसरीच्या अंतिम कुस्ती दिव्या कांकरन उत्तरप्रदेश विरुध्द शिक्षा दिल्ली यांच्यात छत्रपती संभाजीराजे यांच्या हस्ते लावण्यात आली. अंतिम कुस्तीत १ मिनिटांच्या आत दिव्याने शिक्षाचा गदालोड डावावर मात करीत ताराराणी केसरीची गदा व १ लाख रु.पटकाविले.

तिला छत्रपती संभाजीराजे यांच्या हस्ते बक्षिस देण्यात आले. यावेळी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, मालोजीराजे भोसले, अमुल बुचडे, नामदेवराव मोहिते, जयसिंह मोहिते-पाटील, मदनसिंह मोहिते-पाटील, आ. रणजितसिंह मोहिते-पाटील, धैर्यशील मोहिते-पाटील, सत्यप्रभादेवी मोहिते-पाटील शितलदेवी मोहिते-पाटील आ. राम सातपुते उपस्थित होते.

ताराराणी महिला केसरी कुस्ती स्पर्धेत १५ वर्षाखालील गटात ३० किलो गायत्री पुणे, ३५ तनुष्का देवकर सांगली, ४० किलो वेदिका शेंडे सातारा, ४५ किलो अंजली हरियाणा, ५० किलो खुशी दिल्ली, ५५ किलो संध्या हरीयाणा, ६० किलो रुबीन दिल्ली, वरीष्ठ गटात ५३ किलो कल्याणी गादेकर वाशिम,,५७ किलो अंशुदेवी हरीयाणा, ६० किलो रुविणा दिल्ली, ६२ किलो सोनाली मंडलिक अहमदनगर, ६८ किलो पुष्पा हरीयाणा तर राज्य कुस्तीगीर परीषदेच्या ५ व्या सब ज्युनियर कुस्ती स्पर्धेत १७ वर्षाखालील गटात ४० किलो पुर्वा परदेशी पुणे, ४३ किलो श्रावणी लवटे कोल्हापूर, ४६ किलो शिवानी कर्वे सोलापूर, ४९ किलो रुपाली शिंदे हिंगोली, ५३ किलो सोनाली शिंदे धाराशिव, ५७ किलो भक्ती आवाड, ६१ किलो अमृता चौगुले सातारा, ६५ किलो श्रावणी सातकर पुणे, ६९ सिध्दी खोपडे ठाणे, ७३ किलो, आराधना सांगली यांनी विजेतेपद पटकावून सुवर्ण पदकांच्या मानकरी ठरल्या.

ताराराणी महिला केसरी कुस्ती स्पर्धेच्या १५ वर्षाखालील ३० किलो वजनी गटात गायत्री शिंदे पुणे (विजेती) सई सपाटे धाराशिव (उपविजेती, ३५ किलो तनुष्का देवकर सांगली (विजेती), अनुष्का शिंदे सोलापूर (उपविजेती), ४० किलो वेदीका शेंडे सातारा (विजेती), तनिष्का हरियाणा (उपविजेती), ४५ किलो अंजली हरीयाणा (विजेता), क्षितीजा मरगजे रायगड (उपविजेती), ५० किलो खुशी दिल्ली (विजेती), ऋतिका पाटील कोल्हापूर (उपविजेती) ५५ किलो संध्या हरियाणा (विजेती), धनश्री कोल्हापूर (उपविजेती), ६० किलो रुविणा दिल्ली (विजेती), आयुष्का वाशिम (उपविजेती), १७ वर्षाखालील सब ज्युनियर ४० किलो पूर्वा परदेशी पुणे (विजेती) समिक्षा जळगांव (उपविजेती), ४३ किलो श्रावणी लवटे कोल्हापूर (विजेती)अनुष्का हापसे सातारा (उपविजेती) ४६ किलो शिवानी कोल्हापूर(विजेती) आकांक्षा जाधव पुणे(उपविजेती),४९ किलो रूपाली शिंदे हिंगोली(विजेती)तृप्ती गुरव कोल्हापूर(उपविजेती),५७ किलो भक्ती आवाड नाशिक (विजेती) वैभवी मासाळ पुणे (उपविजेती),५३ किलो सोनाली शिंदे धाराशिव (विजेती) गौरी पाटील कोल्हापूर (उपविजेती), ६१ किलो अमृता चौगुले सातारा (विजेती)लावण्या देशमुख रायगड (उपविजेती),६५ किलो श्रावणी सातरकर पुणे (विजेती) पौर्णिमा उस्मानाबाद (उपविजेती),६९ किलो सिद्धी खोपडे ठाणे (विजेती) कामिनीदेवी अहमदनगर (उपविजेती),७३ किलो आराधना सांगली(विजेती) तृप्ती सातारा(उपविजेती)

ताराराणी केसरी वरिष्ठगट ५३ किलो कल्याणी गादेकर वाशिम (विजेती) तेजस्विनी शिंदे धाराशिव (उपविजेती) ५७ किलो अंशुदेवी हरियाणा (विजेती) धनश्री फड अहमदनगर (उपविजेती) ६२ किलो सोनाली मंडलिक अहमदनगर (विजयी) साक्षी पाटील सातारा (उपविजेती), ६८ किलो पुष्पा हरियाणा) विजयी सृष्टी भोसले कोल्हापूर (उपविजेती)

हेही वाचा : 

Back to top button