सोलापूर : स्वस्त सोने आता विसरा; अमेरिकेतील बुडालेल्या बँकांचाही परिणाम | पुढारी

सोलापूर : स्वस्त सोने आता विसरा; अमेरिकेतील बुडालेल्या बँकांचाही परिणाम

सोलापूर;पुढारी वृत्तसेवा : कोरोना महामारी, नैसर्गिक आपत्ती आणि अस्थिरता यामुळे सोन्याच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. रोजच्या वाढणार्‍या दरामुळे भविष्यात स्वस्त सोन्याचे स्वप्न स्वप्नच राहणार आहे.

युक्रेन-रशिया युद्धाचा परिणामही जागतिक सोन्याच्या बाजारावर मोठ्या प्रमाणात झाला आहे. यात अमेरिकेतील बुडालेल्या बँकेचा थेट या बाजाराला दणका बसला. यामुळे निर्माण झालेल्या अस्थिरतेचा फटका सोन्याला बसून दर वाढत आहेत. सराफ व्यापार्‍यांच्या अंदाजानुसार एकट्या अमेरिकेकडे 70 टक्के, तर उर्वरित देशांकडे 30 टक्के सोने आहे. त्या 30 टक्क्यांतील फक्त आणि फक्त तीन टक्के सोने भारतात आहे. अशात दैनंदिन गरजांच्या वस्तूंचे दर वाढत आहेत. अस्थिरतेच्या परिणामामुळे रुपयाही घसरला असून डॉलर 82 रुपयांवर पोहोचला आहे. यामुळे सोन्याच्या भावाला झळाळी येत आहे. तोळ्यात जास्त खरेदी झाल्यास सोन्याचा दर वाढत नाही, तर किलो आणि अब्जावधी रुपयांत होणार्‍या खरेदीमुळे सोन्याचा दर वाढत असतो. जागतिक अर्थकारणात आलेल्या मरगळीमुळे किलो आणि अब्जावधीत सोने खरेदी करणारे पुरवठादारही शांत आहेत.

Back to top button