गुड न्यूज... सोलापूर जिल्ह्यात वाढतोय मुलींचा जन्म दर! | पुढारी

गुड न्यूज... सोलापूर जिल्ह्यात वाढतोय मुलींचा जन्म दर!

सोलापूर; पुढारी वृत्तसेवा :  गेल्या काही वर्षांपासून राज्यात मुलांच्या प्रमाणात मुलींचा जन्म दर कमी होत चालला आहे. मुलींचा जन्म दर वाढावा म्हणून प्रयत्न आणि जनजागृती करण्यात येत आहे. या प्रयत्नांना सोलापूर जिल्ह्यात यश मिळताना दिसत आहे. जिल्ह्यातील सांगोला तालुक्यात एक हजार मुलांमागे आता एक हजार 119 मुलींची संख्या आढळली आहे. अक्कलकोट, कुर्डुवाडीतही मुलांच्या तुलनेत मुलींचा जन्म दर जास्त आहे.

सन 2022 मध्ये दर हजारी मुलांमागे सोलापूर महानगपालिका हद्दीत मुलींचा जन्म दर 978 तर सोलापूर जिल्ह्यातील मुलींचा सरासरी जन्म दर 945 आहे. अन्य तालुक्यांनी सांगोल्याचा आदर्श घेऊन मुलींची संख्या वाढण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी केले आहे. स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी व मुलींचा जन्म दर वाढण्यासाठी जिल्ह्यातील सोनोग्राफी सेंटर्सची कडक तपासणी करावी. तसेच, तहसीलदार, पोलीस व समितीच्या सदस्यांनी धडक मोहीम राबवावी. यासाठी जिल्हा प्रशासनाचे संपूर्ण सहकार्य राहील, अशी सूचना अप्पर जिल्हाधिकारी ठोंबरे यांनी केली आहे.

Back to top button