सोलापूर : राष्ट्रीय सेवा योजनेतूनच व्यक्तिमत्त्वाचा विकास शक्य : श्रीकांत धारूरकर

सोलापूर, रोहित हेगडे : सोलापूर जिल्हातील गावडी दारफळ येथे सात दिवशी राष्ट्रीय सेवा योजनेचे निवासी शिबिर आयोजित करण्यात होते. हे शिबिर श्रीराम ग्रामीण संशोधन व विकास प्रतिष्ठान संचलित लोकमंगल विज्ञान व उद्योजकता महाविद्यालय वडाळा यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. पु. आ. हो. सोलापूर विद्यापीठतील वाणिज्य व व्यवस्थापन विभागाचे प्रा. श्रीकांत धारूरकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी बोलमाना धारूरकर म्हणाले की, स्वयंप्रेरणा,स्वयंशिस्त, अभ्यासातील सातत्य, आपली कार्यशैली आणि सामाजिक संवेदनशीलता हे पंचसूत्र व्यक्तिमत्त्वाचे विकसन करायला मदत करतात. तसेच विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्वाचे विकसन हे राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून महाविद्यालये विद्यापीठ करत असतात. जगातील सर्वच महापुरुषांनी भौतिक जगतात विद्यार्जन व कौशल्य विकसन याला महत्व दिले आहे. विद्यार्थ्यांनी आपला वेळ संशोधन, कौशल्य विकसन यामध्ये घालवावा. असे ते म्हणाले.
या कार्यक्रमाला शिक्षक, पालक यांच्यासह मोठया प्रमाणात विद्यार्थी उपस्थित होते. तर सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक कदम सर यांनी केले. डॉ. किरण जगताप, राष्ट्रीय सेवा योजना समाधान कदम, सुजाता देवकर, भारती जाधव, संजय कदम आणि विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.