कर्मचारी सकाळी आंदोलनात तर दुपारी कामावर! | पुढारी

कर्मचारी सकाळी आंदोलनात तर दुपारी कामावर!

सोलापूर; पुढारी वृत्तसेवा :  जुनी पेन्शनच्या मागणीसाठी पुकारण्यात आलेल्या राज्यव्यापी बेमुदत संपात सोलापूर महापालिकेचे कर्मचारी सकाळी सहभागी झाले खरे पण दुपारी बहुतांश कार्यालयात कर्मचार्‍यांची गजबज दिसून आली. शिस्तभंगाची कारवाई होण्याच्या भीतीपोटी कर्मचारी कामावर परतल्याचे सांगण्यात आले.

महापालिका हिरवळीवर सोमवारी सायंकाळी कामगार संघटनांच्या प्रमुख पदाधिकार्‍यांनी एकत्र येऊन आज मंगळवारी होणार्‍या संपाचे नियोजन केले होते. कोणत्याही स्थितीत हा संप यशस्वी करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानुसार मंगळवारी सकाळी महापालिका कौन्सिल हॉल समोर कर्मचार्‍यांनी एकत्र येऊन जोरदार निदर्शने केली. याप्रसंगी कामगार नेते अशोक जानराव आदींची भाषणे झाली. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयसमोरील आंदोलनात कर्मचारी सहभागी झाले होते. दुपारनंतर प्रशासकीय इमारतीतील कार्यालये गजबजली. काही कर्मचार्‍यांनी तर सकाळीच बायोमेट्रिक हजेरी लावली होती. शिस्तभंगाच्या कारवाईच्या भीतीमुळे कर्मचारी दुपारी कामावर परतले

Back to top button