सोलापूर : किरणा मालाच्या दुकानास भीषण आग; लाखो रूपयांचे नुकसान | पुढारी

सोलापूर : किरणा मालाच्या दुकानास भीषण आग; लाखो रूपयांचे नुकसान

टाकळी सिकंदर : पुढारी वृत्‍तसेवा येथील किराणा मालाच्या दुकानास आग लागली. या आगीत लाखो रूपयांचे नुकसान झाले. यामध्ये जीवित हानी झालेली नाही.

या विषयी अधिक माहिती अशी की, टाकळी-सिंकदर येथील शिवाजी चौकातील दिलीप वाघमोडे रा. पुळूज ता. पंढरपूर यांच्या मालकीच्या किराणा दुकानाला आज (शनिवार) सकाळी ८ वाजण्याच्या दरम्यान अचानक आग लागली. हि आग कशामुळे लागली हे मात्र समजू शकलेले नाही.

किराणा दुकानास लागलेल्‍या या भीषण आगीमुळे भिमा सह.साखर कारखान्याच्या अग्नीशमन दलाच्या एका बंबानेही आग आटोक्यात आली नाही. किराणामालाचे दुकान असल्‍याने दुकानातील गोडे तेल,खोबरेल तेल मोठ्याप्रमाणात असल्याने बघता बघता आगीने रौद्ररुप धारण केले. उपस्थीत जमावानेही आग नियंत्रित आणण्यासाठी जिवाचे रान केले. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

हेही वाचा :  

Back to top button