सोलापूर : कडाक्याच्या थंडीत रेल्वे रुळांमध्ये ‘हेअर क्रॅक’ होण्याचा धोका | पुढारी

सोलापूर : कडाक्याच्या थंडीत रेल्वे रुळांमध्ये 'हेअर क्रॅक' होण्याचा धोका

सोलापूर; पुढारी वृत्तसेवा : सध्या हिवाळा ऋतू सुरू असून कडाक्याच्या थंडीमुळे रेल्वे रूळ आकुंचन पावल्यास रुळाला तडे जातात. यामुळे धावत्या रेल्वेचा वेग अधिक असल्यास रेल्वे घसरून अपघात होण्याची शक्यता असते. यासाठी सोलापूर विभागातील रेल्वेची यंत्रणा हेअर क्रॅकच्या दुरुस्तीच्या कामासाठी सतर्क झाली आहे. त्याचबरोबर गँगमनची रात्रीची गस्त वाढवली आल्याची माहिती रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.

हिवाळ्यात थंडीमुळे रेल्वे रुळांमध्ये हेअर क्रॅक होण्याची भीती असते. याकडे वेळीच लक्ष न दिल्यास रेल्वेचा अपघात होण्याची शक्यता असते. यासाठी रेल्वेकडून सर्व प्रकारची खबरदारी घेण्यात येत आहे. हिवाळ्यात हेअर ट्रॅकच्या घटनांवर बारकाईने लक्ष देण्याच्या सूचना गँगमनला करण्यात येत आहे. तसेच हेअर ट्रॅकची घटना त्वरित लात यावी यासाठी 150 ट्रॅकमॅनकडून पाहणी होत आहे. पाहणीत असे काही अढळल्यास यावर वेळीच उपाययोजना केल्या जात आहेत. त्याचबरोबर नाईट पेट्रोलिंग ही वाढविण्यात आले असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Back to top button