सोलापूर : क्रेडिट कार्ड बंद करतो म्हणत दीड लाखाला गंडा | पुढारी

सोलापूर : क्रेडिट कार्ड बंद करतो म्हणत दीड लाखाला गंडा

टाकळी सिकंदर; पुढारी वृत्तसेवा :  तुमचे क्रेडिट कार्ड बंद करून देतो, असे म्हणत वैयक्तिक माहिती मागून सुनील नारायण मस्के (रा. आण्णाभाऊ साठे नगर, मोहोळ) यांची १ लाख ४४ हजार ९४९ रुपयांची ऑनलाईन फसवणूक केली. ही घटना मोहोळ शहरात घडली.

सुनिल मस्के यांचे स्टेट बँकेत खाते आहे. त्यांनी या बँकेचे क्रेडिट कार्ड काढले होते. गुरुवारी त्यांना अनोळखी मोबाईलवरून कॉल आला व त्यांना त्या काढलेल्या क्रेडिट कार्डचे भाडे भरावे लागेल असे सांगण्यात आले. या नंतर त्याच मोबाईल नंबरवरून ता. १३ ला क्रेडिट कार्डचा फोटो मागून घेण्यात आला. पुन्हा १४ तारखेला त्याच नंबरवरून परत कॉल आल्यावर वैयक्तिक माहिती घेत कार्ड बंद करण्यासाठी तुमच्या नंबरवर एक ओटीपी येईल, ओटीपी मला पाठवा असे सांगत तो ओटीपी घेऊन पुढील २४ तासांत तुमचे क्रेडिट कार्ड बंद होईल, असे सांगण्यात आले.

काही वेळानंतर पुन्हा याच नंबर वरून कॉल आला व आपली आपले क्रेडिट कार्ड बंद होत नाही तुमचे पॅन कार्ड पाठवा असे सांगण्यात आले ते ही पाठविण्यात आले. त्यानंतर काही वेळात खात्यावरील ५१ हजार काढल्याचा मॅसेज आला. त्यानंतर २४ हजार, २० हजार, १० हजार असे १ लाख ४४ हजार खात्यावरील कट झाल्याचा मॅसेज आला, तेव्हा मला माझी फसवणूक झाली असल्याचे लक्षात आल्यानंतर क्रेडिट कार्ड ताबडतोप बंद केले. त्यामुळे आणखी पुढील पैसे जाणे टळले, या झालेल्या फसवणुकीची तक्रार मस्के यांनी मोहोळ पोलिसांत दिली आहे.

Back to top button