सोलापूर : तिर्हे मार्गे पंढरपूर-सातारा रस्ता ‘166 राष्ट्रीय महामार्गात समाविष्ट’ व्हावा : खा. धनंजय महाडिकांची राज्‍यसभेत मागणी | पुढारी

सोलापूर : तिर्हे मार्गे पंढरपूर-सातारा रस्ता '166 राष्ट्रीय महामार्गात समाविष्ट' व्हावा : खा. धनंजय महाडिकांची राज्‍यसभेत मागणी

सोलापूर, पुढारी वृत्‍तसेवा : सोलापूर तिर्हे मार्गे पंढरपूर – सातारा हा रस्ता ‘राष्ट्रीय महामार्गात समाविष्ट केला जावा, अशी मागणी खासदार धनंजय महाडिक यांनी राज्यसभेत केली आहे.

गेली वीस पंचवीस वर्षांपासून कुरूल ते टाकळी सिकंदर मार्गे पंढरपूर या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. या भागातील नागरिक, स्थानिक नेते खासदार धनंजय महाडिक यांच्याकडे लेखी निवेदन व प्रत्यक्ष भेटी घेऊन  रस्त्याच्या दुरूस्तीची मागणी केली होती. खा. महाडिक यांनी नोव्हेंबर महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे यासंदर्भात निधीची मागणी केली.  २० कोटीचा निधी दिल्यानंतर या भागातील रस्‍त्‍यांची कामे पुन्हा सुरू झाली आहेत.

हा मार्ग महाबळेश्वर, सातारा,पंढरपूर, सोलापूर, तुळजापूर व अक्कलकोट या धार्मिक स्थळानाही जोडणारा मार्ग आहे.तसेच राष्ट्रीय राज्य मार्ग संख्या-४ पश्चिम भागाला जोडणारा व मुंबई-पुणे -बंगलोर या राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा ही मार्ग आहे.  पंढरपूरला चैत्री,आषाढी,कार्तीकी व माघी वारीला पायी जाणाऱ्या दिंड्या, वारकरी व या भागातील नागरिक लाखोच्या संख्येने प्रवास करतात. तसेच या परिसरात मोठ्या प्रमाणावर ऊस, द्राक्ष, डाळिंब, लिंबू, कांदा पिकांची उत्पादन होते. या भागातील  साखर कारखान्यांना ऊस पूरवठा करणारी वाहने व साखर वाहतूक करणारी वाहने या सर्वाना याच रस्त्याचा वापर करावा लागत आहे. त्यामुळे या भागातील जनतेला या रस्त्याचा दळणवळणाला उत्तम होणार आहे, असेही महाडिक यांनी म्‍हटलं आहे.

हेही वाचा :

Back to top button