मंगळवेढा तालुक्यातील १६ ग्रामपंचायतीसाठी ८४.३८ टक्के झाले मतदान | पुढारी

मंगळवेढा तालुक्यातील १६ ग्रामपंचायतीसाठी ८४.३८ टक्के झाले मतदान

मंगळवेढा, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील १६ ग्रामपंचायतीसाठी चुरशीने ८४.३८ टक्के मतदान झाले. सोड्डी, शिरनांदगी, गोणेवाडी गावात मतदान दरम्यान पोलिसांशी वादावादीच्या घटना घडल्या.

मंगळवेढा तालुक्यातील १६ ग्रामपंचायतीत सरपंच पदासाठी ४७ तर सदस्य पदासाठी ३१६ उमेदवार निवडणूक आखाड्यात उतरले होते. ५० मतदान केंद्रावर आज सकाळपासून चुरशीने मतदान झाले. १६ गावातील २९९४० पैकी २५२६४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. यंदा प्रथमच सरपंच पद हे मतदानामधून निवडले जात असल्यामुळे वर्षानुवर्षे ग्रामपंचायतीच्या खुर्चीला चिटकून राहिलेले राजकिय सत्ताधार्‍यांचे धाबे दणाणले आहेत. पुर्वी सत्ताधारी आपल्याच गटाकडे सरपंच रहावे यासाठी राजकिय वजन वापरून सरपंच पदाची निवड केली जात असे.

यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुकीत मात्र चित्र उलटे झाल्याने सरपंचपद आपल्याच गटाकडे रहावे यासाठी ते मतदारांना विनवणी करून मत आपल्या पारडयात कसे पडेल याकडेच कल दिसून येत होता. सोड्डी मतदान केंद्रावर मतदाराबरोबर येणार्‍या कार्यकर्त्यासोबत पोलिसांची बाचाबाची झाल्याचे चित्र होते. दरम्यान, पोलिसांनी खबरदारी घेत परिस्थितीचे भान ठेवून नियंत्रण मिळविण्यात ते यशस्वी ठरले. दरम्यान येथे उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील यांनी भेट दिली.

गावनिहाय झालेली मतांची टक्केवारी पुढीलप्रमाणे बाचवी -८१.८४ टक्के, पौट-८४.२५ टक्के, येड्राव -८७.९९ टक्के, सोड्डी -८३.२७ टक्के, गुंजेगाव – ८६.५४ टक्के, ढवळस – ८१.८४ टक्के,मारापूर -८३.३९ टक्के, शिरनांदगी -८७.१९ टक्के,मारोळी – ८५.४३ टक्के, पाटखळ मेटकरवाडी – ८२.०२, गोणेवाडी – ८६.६७ टक्के, खोमनाळ – ८४.५३ टक्के, हाजापूर -८३.९२ टक्के, तळसंगी -८६.१९ टक्के, डोंगरगांव – ८०.२५ टक्के, भालेवाडी -८५.४७ असे एकूण २९९४० पैकी २५,२६४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावल्याने सरासरी ८४.३८ टक्के इतके मतदार १६ ग्रामपंचायतीसाठी झाले आहे. दरम्यान, मतमोजणी मंगळवार दि.२० डिसेंबर रोजी शासकिय गोडावूनमध्ये सकाळी ८.३० पासुन सुरु होणार आहे.

मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी डी.वाय.एस.पी. राजश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरिक्षक रणजित माने, सहाय्यक पोलिस निरिक्षक सत्यजीत आवटे, अंकुश वाघमोडे, अमोल बामणे, बापूसाो पिंगळे व गोपनीय विभागाचे पोलिस हवालदार गेजगे व वाघमारे आदी परिस्थितीवर लक्ष ठेवून होते.

हेही वाचा…

Back to top button