सोलापूर : ‘सिव्हिल’मध्ये 40 टक्के जागा रिक्त

सोलापूर : ‘सिव्हिल’मध्ये 40 टक्के जागा रिक्त

सोलापूर; पुढारी वृत्तसेवा : श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय आणि डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामधील प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक यासह हॉस्पिटलमधील वर्ग एक ते चार संवर्गाच्या 40 टक्के जागा रिक्त आहेत. परिणामी हॉस्पिटलमध्ये कायमस्वरूपी डॉक्टर नसल्याने रुग्णांचे हाल होत आहेत.

शहरातील सर्वसामान्य रुग्णांचा आधार असलेल्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मागील वर्षभरापासून विविध पदांच्या रिक्त जागा अद्याप भरण्यात आलेल्या नाहीत. यामुळे अपुर्‍या मनुष्यबळावर सिव्हिल हॉस्पिटलचे कामकाज सुरू आहे. सिव्हिल हॉस्पिटलमधील 21 विभागांतर्गत वर्ग एक, दोन, तीन, चार या प्रवर्गासह नर्सिंग स्टाफ, असे एकूण 1102 मंजूर पदे भरणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात याठिकाणी 612 पदे भरण्यात आली आहेत. उर्वरित 490 जागा अद्याप रिक्त आहे.

महाविद्यालयासाठी एकूण 501 पदे मंजूर आहेत. याठिकाणी 299 जागा भरण्यात आल्या आहेत. उर्वरित 202 जागांवर अद्याप कर्मचारी नेमणूक करण्यात आलेली नाही. परिणामी अनेक विभागांत प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक यासारखी मुख्य पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. यामुळे सध्या कामावर रूजू असलेल्या डॉक्टर, नर्सिंग स्टाफ, कंत्राटी कर्मचार्‍यांसह शिकाऊ डॉक्टरांवर हॉस्पिटलचे कामकाज सुरू आहे.

रुग्णांना तासंतास प्रतीक्षा

सिव्हिल हॉस्पिटलमध्ये वेगवेगळ्या रोगांवरील उपचारासाठी 21 विभाग कार्यरत आहेत. परंतु, याठिकाणी कर्मचारी संख्या अपुरे असल्याने रुग्णांना तासन्तास उपचारासाठी ताटकळत उभे राहावे लागत आहे. उपचारानंतर मोफत औषधासाठी दहा नंबर काऊंटरवर लांबच लांब रांगा लावून उभे राहावे लागते.

अध्यापकांची सद्यःस्थिती…

पदनाम                     मंजूर पदे            भरलेली पदे         रिक्त पदे
अधिष्ठाता                        01                    01                   01
प्राध्यापक                        21                   14                    07
सहयोगी प्राध्यापक            57                   41                    16
सहाय्यक प्राध्यापक           80                   66                    14
इतर वर्ग-2 अधिकारी        17                   09                    08

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news