सोलापूर : सिद्धेश्वर साखर कारखान्याच्या वतीने सोलापूर-विजापूर महामार्गावर रास्ता रोको | पुढारी

सोलापूर : सिद्धेश्वर साखर कारखान्याच्या वतीने सोलापूर-विजापूर महामार्गावर रास्ता रोको

सोलापूर, पुढारी वृत्तसेवा : सिद्धेश्वर साखर कारखान्याच्या चिमणी पाडकामाच्या विरोधात कारखान्याचे माजी चेअरमन धर्मराज काडादी यांच्या नेतृत्वाखाली आज दुपारी १२ वाजता सोलापूर – विजापूर राज्य महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

हरित लवादाने कारखान्याचा गाळप बंद करावा, असे आदेश देण्यात आले असून याविरोधात माजी आमदार शिवशरण पाटील, बाजार समितीच्या संचालिका इंदुमती अलगोंडा पाटील, जिल्हा परिषद सदस्य अमर पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य अशोक देवकते, कारखान्याचे संचालक शिवानंद पाटील, श्रीशैल पाटील, राधाकृष्ण पाटील, प्रमोद बिराजदार यांच्यासह सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे सभासद शेतकरी यांनी सोलापूर – विजापूर राज्य महामार्ग अडवून रास्ता रोको केला. मान्यवरांनी मनोगते व्यक्त करत कोणत्याही परिस्थितीमध्ये कारखाना बंद पडू देणार नाही, असा सूर धरला. यावेळी कोणताही अनुचित प्रकार होऊ नये, यासाठी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला.

Back to top button