सोलापूर : कार्तिकी एकादशी निमित्‍त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्‍ते महापूजा | पुढारी

सोलापूर : कार्तिकी एकादशी निमित्‍त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्‍ते महापूजा

सोलापूर; पंढरपूर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सौ अमृता फडणवीस, मानाचे वारकरी उत्तमराव साळुंखे व सौ कलावती साळुंखे यांच्या हस्ते कार्तिकी एकादशी निमित्‍त मुख्य शासकीय महापूजा संपन्न झाली. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत हे यावेळी उपस्थित होते.

कार्तिकी एकादशी निमित्त श्री विठ्ठलाच्या शासकीय महापूजेचा मानाचा वारकरी म्हणून उत्तमराव माधवराव साळुंखे (वय ५८) व कलावती उत्तमराव साळुंखे (वय ५५, रा.शिरोडी खुर्द, फुलंबी जि. औरंगाबाद) या दापत्याची निवड करण्यात आली. यामुळे साळुंखे दाम्पत्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विठ्ठलाची शासकिय महापूजा करण्याचा मान मिळाला.

कार्तिकी एकादशीला उपमुख्यमंत्र्यांसोबत विठ्ठलाच्या शासकीय महापूजेवेळी मानाच्या वारकरी म्हणून दर्शन रांगेतून माळकरी भाविकाची निवड केली जाते. यंदाच्या वर्षी हा उत्तमराव माधवराव साळुंखे (वय. ५८) व कलावती उत्तमराव साळुंखे (वय ५५, रा.शिरोडी खुर्द, फुलंबी जि. औरंगाबाद) यांना हा मान मिळाला असून, हे पती-पत्नी मागील ५० वर्षापासून विठुरायाची यात्रा करीत आहेत. त्यांना दोन मुले, २ मुली व नातवंडे असा परिवार असल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी गजानन गुरव यांनी दिली.

प्रबोधिनी एकादशी निमित्त सजावट…

प्रबोथिनी एकादशी (कार्तिकी यात्रा) निमित्त श्री.विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीच्या वतीने श्री. नामदेव पायरी श्री. विठ्ठल सभामंडप श्री.विठ्ठल व रूक्मिणीमातेच्या गाभाऱ्यात सुंदर व आकर्षक अशी फुलाची आरास करण्यात आली आहे.

हेही वाचा :  

Back to top button