सोलापूर : जि.प.चे शिक्षणाधिकारी किरण लोहार २५ हजारांची लाच घेताना ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात

Solapur : Kiran Lohar
Solapur : Kiran Lohar

सोलापूर: पुढारी वृत्तसेवा : प्राथमिक शाळेच्या मान्यतेसाठी 50 हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून 25 हजार रुपये कार्यालयातच स्वीकारणाऱ्या सोलापूर जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी किरण लोहार यांना ताब्यात घेण्यात आले. लोहार यांच्यासह लिपिकाला सोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. ही कारवाई सोमवारी (दि.३१) सायंकाळी सहाच्या सुमारास करण्यात आली. यामुळे सोलापूर जिल्हा परिषदेत खळबळ उडाली आहे.

या प्रकरणातील तक्रारदाराची उत्तर सोलापूर तालुक्यातील कोंडी येथे स्वयंअर्थसहाय प्राथमिक शाळा आहे. पाचवी ते आठवीचे वर्ग वाढविण्यासाठी शाळेने वर्गवाढीच्या परवानगीची मागणी प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहारा यांच्याकडे केली होती. त्याचा आयडी देण्यासाठी शिक्षणाधिकारी लोहार यांनी 50 हजार रुपयांची लाच मागितली. दरम्यान, तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. तक्रारीची शहानिशा करून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी सायंकाळी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातच सापळा लावला होता.

सायंकाळी सहाच्या सुमारास शिक्षणाधिकारी लोहार यांनी तक्रारदाराकडून लाचेची 25 हजार रुपयांची रक्‍कम स्वीकारताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लोहार यांना रंगेहात अटक केली. यावेळी लोहार यांच्यासमवेत त्यांच्याच कार्यालयातील कनिष्ठ सहायक अल्ताफ पटेल या लिपिकालाही अटक करण्यात आली आहे. ही कारवाई निरीक्षक उमेश महाडिक यांच्या पथकाने केली. सदर बझार पोलीस ठाण्यात याबाबत रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

हेही वाचलंत का ? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news