

सोलापूर ; पुढारी वृत्तसेवा : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या अधिकार मंडळाच्या निवडणुकीच्या मतमोजणीला आज (शुक्रवार) सकाळी दहा वाजता सुरुवात झाली आहे. सुरुवातीला सिनेटच्या विद्यापीठ शिक्षकांची मतमोजणी झाली. यामध्ये खुल्या गटातून डॉ. प्रभाकर कोळेकर हे 14 मते घेऊन विजयी झाले. त्यांचे प्रतिस्पर्धी डॉ. विकास घुटे यांना आठ मते मिळाली. त्यांचा पराभव झाला. अनुसूचित जमाती प्रवर्गातून डॉ. विकास कडू यांनी 16 मते घेऊन त्यांनी विजय संपादन केला. त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार डॉ. श्रीराम राऊत यांना पाच मते मिळून ते पराभूत झाले.
तर रसायनशास्त्र अभ्यास मंडळासाठी डॉ. अब्दुल शेख, डॉ. सतीश देवकर आणि डॉ. विशाल कदम यांनी विजय मिळविला आहे. डॉ. सतीश मित्रगोत्री यांचा पराभव झाला. प्राणीशास्त्र अभ्यासमंडळात डॉ. राजशेखर हिप्परगी, डॉ. संध्या साळुंखे आणि डॉ. लक्ष्मीकांत दामा यांचा विजय झालेला आहे. डॉ. विजयकुमार गाडेकर यांचा पराभव झाला. शैक्षणिक मूल्यमापन अभ्यासमंडळाच्या निवडणुकीत डॉ. सुग्रीव गोरे, डॉ. विद्युलता पांढरे आणि डॉ. प्रशांत ठाकरे यांचा विजय झालेला आहे. डॉ अश्विन बोंदार्डे यांचा पराभव झाला. इंग्रजी अभ्यास मंडळात डॉ. समाधान माने, डॉ. रामराजा मोटे आणि डॉ. मनोहर जोशी यांचा विजय झाला. तर डॉ. अनुपमा पोळ यांचा पराभव झाला.
कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली कुलसचिव तथा निवडणूक निर्णय अधिकारी योगिनी घारे यांनी मतमोजणीला सुरुवात केली आहे. मतमोजणीसाठी उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी विद्यापीठात उपस्थित आहेत.
हेही वाचा :