J&K News : पहाटेपासून सुरू असलेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार, वाचा अपडेट्स | पुढारी

J&K News : पहाटेपासून सुरू असलेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार, वाचा अपडेट्स

पुढारी ऑनलाइन डेस्क : J&K News : बारामुल्लाच्या पट्टण भागातील येडीपोरा येथे सुरू आज शुक्रवारी पहाटे पासून सुरू असलेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात सुरक्षा दलांना यश आले आहे. दहशतवाद्यांची शोध मोहिम अजूनही सुरू आहे. ठार झालेले दोन्ही दहशतवादी स्थानिक असून ते प्रतिबंधित दहशतवादी संघटनेशी संबंधित होते, अशी माहिती एडीजीपी काश्मीर झोन, विजय कुमार यांनी दिली आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये दक्षिण काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यातील चित्रगाम भागात आणि उत्तर काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यातील येडिपोरा पट्टण येथे दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये आज शुक्रवारी पहाटेपासून चकमक सुरू आहे. या चकमकीत आतापर्यंत दोन दहशतवाद्यांना सुरक्षा दलांनी कंठस्नान घातले आहे. शोध मोहीम अजूनही पुढे सुरू आहे. सुरुवातीला एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला. नंतर पुन्हा थोड्यावेळातच आणखी एका दहशतवाद्याला ठार करण्यात सुरक्षा रक्षकांना यश आले.

J&K News पोलीस आणि सुरक्षा दलाच्या संयुक्त पथकाला त्या भागात दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर गोळीबार सुरू झाला. सुरक्षा दलांनी परिसराला वेढा घातल्यानंतर तेथे लपलेल्या दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला आणि सुरक्षा दलांनी प्रत्युत्तर दिले. चकमकीच्या ठिकाणाची झडती घेतली असता, दोन एके सिरीज रायफल, ग्रेनेड आणि इतर युद्धजन्य साठा जप्त करण्यात आला, अशी माहिती पोलिसांनी दिली.

याआधी मंगळवारी कुलगाम जिल्ह्यातील अवोटू गावात जम्मू आणि काश्मीर पोलीस आणि केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) सोबत भारतीय लष्कराने केलेल्या कारवाईत दोन दहशतवादी ठार झाले, असे पोलिसांनी सांगितले.

J&K News अलीकडच्या काळात संपूर्ण काश्मीरमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमकी झाल्या आहेत ज्यात अनेक दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे.

हे ही वाचा :

J&K News : बारामुल्लाच्या येडीपोरा, पट्टण भागात दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक

J&K News : उधमपूर येथे बसमध्ये 24 तासात दुसरा स्फोट

Back to top button