सोलापूर विद्यापीठाचा युवा महोत्सव ७ ते १० ऑक्टोबरला होणार; ३० सप्टेंबर प्रवेशिकांची अंतिम मुदत

सोलापूर विद्यापीठ
सोलापूर विद्यापीठ

सोलापूर, पुढारी वृत्तसेवा : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा अठरावा युवा महोत्सव होणार आहे. हा महोत्‍सव दि. 7 ते 10 ऑक्टोबर 2022 मंगळवेढा येथील दलित मित्र कदम गुरुजी विज्ञान महाविद्यालयात पार पडणार आहे, अशी माहिती कुलगुरू फडणवीस यांनी दिली.

सोलापूर विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाकडून युवा महोत्सवाच्या यजमानपदासाठी प्रस्ताव मागविण्यात आले होते. त्‍यानुसार मंगळवेढा येथील दलित मित्र कदम गुरुजी विज्ञान महाविद्यालयाकडून युवा महोत्सव होणार आहे.

कोरोना कालावधीत युवा महोत्‍सव साजरा झाला नव्हता. त्‍यानंतर आता दोन वर्षाच्या कालावधीनंतर ऑफलाइन पद्धतीने युवा महोत्सव होणार आहे. त्यामुळे भारतीय विश्वविद्यालय संघाकडून प्राप्त सूचनेनुसार काही बदल करण्यात आले आहेत.

युवा विद्यार्थी कलाकारांची आनंदाची बाब म्‍हणजे वयोमर्यादा 25 वर्षावरून 27 इतकी करण्यात आली आहे. त्याचबरोबर दोन संघ व्यवस्थापक, तीन व्यावसायिक साथीदार आणि विद्यार्थी मिळून एकूण 49 जणांच्या संघाची प्रवेशिका यंदा अरणार आहे. तसेच युवा महोत्सवात एकूण 29 कलाप्रकारांचे सादरीकरण असणार आहेत.

विद्यार्थी कलाकारांनी तयारीला लागा; कुलगुरूचे आवाहन

युवा विद्यार्थी कलाकारांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विद्यापीठाकडून युवा महोत्सवाचे आयोजन केले जाते. यासाठी विद्यार्थी कलाकारांचा देखील मोठा प्रतिसाद असतो. सर्व महाविद्यालयातील युवा विद्यार्थी कलाकारांनी महोत्सवाची तयारी सुरू करावी. 30 सप्टेंबर 2022 पर्यंत संबंधित महाविद्यालयांनी विद्यापीठाकडे विद्यार्थ्यांची व संघाची प्रवेशिका देणे आवश्यक आहे, असे कुलगुरू डॉ. फडणवीस यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news