सोलापूर विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत ९३ अर्ज; ४० अर्ज अपात्र | पुढारी

सोलापूर विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत ९३ अर्ज; ४० अर्ज अपात्र

सोलापूर, पुढारी वृत्तसेवा : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या सिनेटसह विविध अधिकार मंडळाच्या निवडणुकांचा कार्यक्रम सुरू आहे. निवडणूक निर्णय अधिकारी श्रेणिक शहा यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी(दि.13) छाननीची प्रक्रिया पार पडली. यामध्ये सिनेटच्या सर्व प्रवर्गातील 39 जागांसाठी 133 उमेदवारी अर्ज आले होते. त्यापैकी 40 जणांचे अर्ज अवैध ठरले असून 93 जणांचे उमेदवार अर्ज पात्र ठरले आहेत.

सोलापूर विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीमध्ये सर्व प्रवर्गातील एकूण 39 जागांसाठी 93 जणांचे उमेदवारी अर्ज छाननी प्रक्रियेत मंजूर झाले आहेत. तर 40 जणांचे अर्ज नामंजूर झाले करण्यात आले आहेत.

प्राचार्यांच्या दहा जागांसाठी नऊ अर्ज आले आहेत. संस्थाप्रतिनिधींच्या सहा जागांसाठी एकूण 13 अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी तीन अर्ज अवैध ठरले असून दहा अर्ज मंजूर झाले आहेत. शिक्षकांच्या 10 जागांसाठी 30 अर्ज आले होते त्यापैकी 23 अर्ज मंजूर तर 7 अर्ज अपात्र ठरले आहेत. विद्यापीठ शिक्षकांच्या तीन जागांसाठी पाच अर्ज झाले होते, त्यापैकी तीन अर्ज मंजूर तर दोन अर्ज अपात्र ठरले आहेत.

पदवीधरच्या दहा जागांसाठी 76 जणांचे उमेदवारी अर्ज आले असून त्यापैकी 48 जणांचे अर्ज मंजूर तर 28 जणांचे अर्ज नामंजूर झाले आहेत. विद्यापरिषदेच्या 8 जागांसाठी 9 अर्ज आले असून 7 अर्ज मंजूर तर 2 अर्ज नामंजूर झाले आहेत, अशी माहिती विद्यापीठाकडून देण्यात आली.

 

Back to top button