सोलापूर: भीमा नदीला महापूर, प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा | पुढारी

सोलापूर: भीमा नदीला महापूर, प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

बेंबळे; पुढारी वृत्तसेवा: उजनीतून भीमा नदीत ६१हजार ६०० क्युसेक्सचा, तर वीरमधून नीरा नदीत १६५० क्युसेक्स विसर्ग झाल्याने, भीमा नदीत 80897अधिक क्यूसेक्स पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे भीमा नदीला महापूर आल्याने, पुन्हा पुरपरिस्थिती उद्भवण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

दौंड येथून उजनी जलाशयात शुक्रवारी दुपारी १.३० हजार क्युसेक्स विसर्गाने पाणी सोडण्यात आले. त्यामुळे उजनी धरणातून भीमा नदीत ६१ हजार ६०० क्युसेक्स विसर्गाने पाणी सोडण्यात आले आहे. तसेच निरा खोऱ्यातील वीर धरणातून नीरा नदीत काल सकाळपासून 6 हजार क्युसेक्स विसर्गाने पाणी सोडण्यात आले होते. पुढे भीमा नदीत आज सकाळपासून 80 हजार897 क्युसेक्स विसर्गाने पाणी प्रवाही राहणार आहे. त्यामुळे भीमा नदीला महापूर येण्याची शक्यता असल्याने नदीकाठच्या गावांनी सतर्क राहण्याचा इशारा प्रशासनातर्फे देण्यात आला आहे.

उजनी धरण व वीर धरण यामधून आज सायंकाळपर्यंत पुन्हा विसर्ग वाढण्याची शक्यता असल्याने, त्यानुसार पाण्याचे नियंत्रण करण्यात येणार असल्याचे धरण नियंत्रण विभागाकडून कळविण्यात येत आहे.

उजनी धरणातील पाणीपातळी

*एकूण पाणीपातळी –  497.210 मीटर
*एकूण पाणीसाठा  –  3449.48 दलघमी
*एकूण पाणीसाठा  –  121.80 टीएमसी
*उपयुक्त  साठा   -1646.67 दलघमी
*उपयुक्त  साठा   –  58.20 टीएमसी
*टक्केवारी   108.53    –   टक्के

आवक

*दौंड विसर्ग      – 45344क्यूसेक
*बंडगार्डन       –  11731  क्यूसेक

विसर्ग

कालवा – 1100क्युसेक
बोगदा -900 क्युसेक
सिना-माढा उपसा सिंचन – २५९ क्युसेक
दहीगाव उपसा सिंचन -43 क्युसेक
वीज निर्मिती – 1600 क्युसेक
नदी विसर्ग -60000 क्युसेक

उजनी धरण वृत्त

शुक्रवार दि.९ सप्टेंबर २०२२, सकाळी ६वा.

पाणी पातळी – 497.210.मीटर…

एकूण साठा – 3449.48. दशलक्ष घनमीटर
…121.80 टीएमसी

उपयुक्त साठा –1646.67 दशलक्ष घनमीटर

Back to top button