सोलापूर : हातभट्टी दारू विकणार्‍या 7 जणांविरुद्ध 4 वेगवेगळे गुन्हे | पुढारी

सोलापूर : हातभट्टी दारू विकणार्‍या 7 जणांविरुद्ध 4 वेगवेगळे गुन्हे

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा : सदर बझार पोलिस ठाण्याच्या हद्दीत हातभट्टी दारू विकणार्‍या 7 जणांविरूध्द 4 वेगवेगळे गुन्हे दाखल झाले आहेत. पहिल्या घटनेत पोलिस कॉन्स्टेबल अबरार दिंडोरे यांनी सदर बझार पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. यात म्हटले आहे की, 21 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास जगजीवनराम झोपडपट्टी येथील दुर्गामाता मंदिराच्याजवळ हणमंती शावनोल ही महिला हातभट्टी दारू विकत होती. यावेळी पोलिसांनी तिच्याकडून 2 हजार रुपयांचे हातभट्टी दारूचे 4 कॅन जप्त केले. या प्रकरणी हणमंती जंबय्या शावनोल वय 42 रा. जगजीवनराम झोपडपट्टी हिच्याविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे. तिला हातभट्टी विकण्यास मुळेगांव तांडा येथील उमेश राठोड याने प्रोत्साहित केले.

दुसर्‍या घटनेत पोलिस कॉन्स्टेबल दिंडोरे यांनीच फिर्याद दाखल केली आहे. यात म्हटले आहे की, 21 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास बापूजी नगर येथील सालार लाकुड वखारीच्या बाजूला हातभट्टी दारूची विक्री होत होती. यावेळी पोलिसांनी 2 हजार 500 रूपयाची हातभट्टी दारू जप्त केली. व उमेश राठोड रा. मुळेगांव तांडा, विलास मारूती गायकवाड रा. सिध्दार्थ हौसिंग सोसायटी या दोघांविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.

तिसर्‍या घटनेत पोलिस कॉन्स्टेबल दिंडोरे यांनी सदर बझार पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. यात म्हटले आहे की, 21 ऑगस्ट रोजी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास लोधी गल्ली येथील नवीन तालीम जवळ हातभट्टी विक्री सुरू होती. यावेळी पोलिसांनी 2 हजार रूपयाची हातभट्टी दारू जप्त केली. या प्रकरणी उमेश राठोड रा. मुळेगांव तांडा व पार्वती सिताराम कोलाकाटी वय 60 रा. लोधीगल्ली या दोघांविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.

चौथ्या घटनेत पोलिस कॉन्स्टेबल सैफन सय्यद यांनी सदर बझार पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. यात म्हटले आहे की, 21 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास लहान इरण्णावस्ती येथे हातभट्टी छारू विक्री होत होती. यावेळी पोलिसांनी 1 हजार 750 रूपयाची हातभट्टी दारू जप्त केली. या प्रकरणी उमेश राठोड रा. मुळेगांव तांडा व जिंदम्मा नागय्या कोळी वय 66 रा. नरसिंग गिरजी मिल जवळ या दोघांवरूध्द गुन्हा दाखल झाला आहे. अशा प्रकारे पोलिसांनी हातभट्टी दारू पकडून 7 जणांविरूध्द 4 वेगवेगळे गुन्हे दाखल केले
आहेत.

Back to top button