मंगळवेढा सिंचन योजनेस 7 दिवसांत मान्यता | पुढारी

मंगळवेढा सिंचन योजनेस 7 दिवसांत मान्यता

लक्ष्मी दहीवडी :  मंगळवेढा तालुक्यातील बहुचर्चित अशा 24 गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न आज पुन्हा एकदा विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात गाजला. मंगळवेढा उपसा सिंचन योजना प्रस्तावास अधिवेशन संपल्यानंतर सात दिवसांत मुख्यमंत्र्यांची मान्यता घेऊन त्यानंतर तो प्रस्ताव सात दिवसांत मंत्रिमंडळाच्या बैठकीत सादर केला जाईल, अशी माहिती उपमुख्ममंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली.

महाराष्ट्र विधानसभा नियम 105 अन्वये  उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेस उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली. उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मंगळवेढा तालुक्यातील 35 गावांतील 11 गावांचा समावेश म्हैसाळ उपसा सिंचन योजनेच्या लाभक्षेत्रात झाला आहे. उर्वरित 24 गावांसाठी मंगळवेढा उपसा सिंचन योजना प्रस्तावित केली आहे. या योजनेसाठी आवश्यक सर्व मान्यता घेतल्या जातील.

Back to top button