सोलापूर : दहीहंडी खेळताना पडून तिघे जखमी

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा : दहिहंडी खेळताना पाय घसरून पडून तिघे जखमी झाले. अक्षय राजेंद्र मडगमकर (वय 25, रा. आम्रपाली चौक, सोनिया नगर, विजापूर नाका, सोलापूर) आणि अभिजित सुरेश सावणे (वय 22, रा. चिंतलवार वस्ती, मोदी, सोलापूर) अशी जखमींची नावे आहेत.
अभिजित सावणे हा मोदी येथे घरासमोर दहीहंडी खेळताना वरून पाय घसरून पडून डोक्यात मार लागून जखमी झाल्याने त्याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, तर अक्षय मडगमकर हा आम्रपाली चौकात दहीहंडी खेळताना खाली पडून डोक्यास मार लागून जखमी झाल्याने त्याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.
सागर तिपण्णा धोत्रे (वय 25, रा. बुधवार पेठ, अक्कलकोट) हा अक्कलकोट येथे दहिहंडी खेळत असताना खाली पडून जखमी झाल्याने त्यास शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. या तिन्ही घटनांची नोंद सिव्हील पोलिस चौकीत नोंद करण्यात आली आहे.