सोलापूर : वडाळा येथे जुगार खेळणाऱ्या १९ जणांवर कारवाई; ४ लाखांचा मुद्देमाल जप्त | पुढारी

सोलापूर : वडाळा येथे जुगार खेळणाऱ्या १९ जणांवर कारवाई; ४ लाखांचा मुद्देमाल जप्त

 सोलापूर; पुढारी वृत्तसेवा : जुगार खेळणाऱ्या 19 जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून रोख रक्कम २९ हजार, मोबाईल, दुचाकीसह एकूण ४ लाख, ३१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्‍यात आला. वडाळा (ता.उत्तर सोलापूर) येथील बस स्टँडच्या बाजूस असलेल्या जुन्या शासकीय रुग्णालयातील पडक्या जागेत सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर उत्तर तालुका पोलिसांनी छापा टाकून ही कारवाई शनिवारी केली.

नागेश तिकुटे (वडाळा), तात्यासाहेब जमदाडे, सत्यवान साठे, रविंद्र गायकवाड,गणी शेख, आकाश काळे,  शहाजी काटे (सावरगांव) , अनिल ढगे (वडाळा), महेश गवळी, गोरख शिंदे , राहुल गायकवाड, सागर कांबळे, दिलीप गायकवाड, अबीर शेख, जयवंत जमदाडे, धनाजी मोहीत, मळसिध्द गाडे, कैयुब कुरेशी (काटीसावरगाव) १आण्णा गाडे. तर अंकुश उर्फ टिल्लू कसबे (रा.वडाळा) यांच्‍यावर ही कारवाई करण्‍यात आली.  तीन जण पसार झाले आहेत.

वडाळा येथे पैशांची पैज लावून मन्ना नावाचा जुगार खेळ सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या आधारे ही कारवाई उत्तर तालुका पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक नेताजी नान्नज, बीटचे पोलीस अशोक खवतोडे, पोलीस कॉन्स्टेबल दीपक पाटील, गजानन स्वामी यांनी केली.  पोलीस काॅन्‍स्‍टेबल अशोक अवताडे यांनी उत्तर तालुका पोलिसांत फिर्याद दिली. तपास सहायक पोलीस निरीक्षक एस. आय. चव्हाण करीत आहेत.

हेही वाचलंत का ? 

Back to top button