वकिलास धक्काबुक्कीप्रकरणी एकावर गुन्हा दाखल | पुढारी

वकिलास धक्काबुक्कीप्रकरणी एकावर गुन्हा दाखल

माढा ः पुढारी वृत्तसेवा : माढा न्यायालयाच्या नवीन कोर्ट इमारत मधीलपॅसेजमध्ये वकिलास शिवीगाळ करून धक्काबुक्की करून, शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी यशवंत बाळासाहेब पाटील (रा बावी तालुका माढा) याच्यावर माढा पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अ‍ॅड प्रशांत श्रीकांत पाटील (रा. महातपूर) यांनी याबाबतची फिर्याद दिली आहे. या प्रकरणात फिर्यादी कोर्ट कामासाठी न्यायालयात निघाले असताना तू कुठे निघालाय, तू कोर्टात जायचे नाही. असे म्हणून फिर्यादीची कॉलर पकडून तू माढा कोर्टात केसेस चालवायचे नाहीत असे म्हणत धमकावले. तू बाहेर चल तुला मी दाखवतोच असे म्हणत कोर्ट कामकाज पाहण्यास जाऊ न देता ओढत कोर्टाबाहेर नेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी असे करू नका असे म्हणताच, आरोपीने फिर्यादीस यापुढे वकिली कशी करतो तेच बघतो. आता तुला सोडत नाही, तुला खालासच करतो. तू बाहेर चल असे, म्हणून अंगाला झटून आत्ता तुला जिवंत सोडलंय. यापुढे दिसला तर जिवंत सोडणार नाही, असे धमकावून फिर्यादीस आरोपीने कोर्ट कामास जाण्यास आडवले. फिर्यादीच्या अंगावर धावून जात शिवीगाळ करत धक्काबुक्क केल्याची फिर्याद पोलिसात दाखल झाली. माढ्यातील मोठ्या संख्येने माढा पोलिसात धाव घेत संबंधितावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

Back to top button