कलबुर्गीत खत कंपनी काढण्याच्या बहाण्याने सोलापुरातील एकास 47 लाखाला फसवले | पुढारी

कलबुर्गीत खत कंपनी काढण्याच्या बहाण्याने सोलापुरातील एकास 47 लाखाला फसवले

सोलापूर ः कलबुर्गीत येथे कंपनी काढू असे सांगून पैश्याचे आमिष दाखवून रविकांत भालेराव यांना गुंतवणूक करवून 47 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी कलबुर्गीतील नऊ जणांविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.कलबुर्गी येथील भीमा कृष्णा केमिकल प्रा. लि.चे चेअरमन ईश्‍वर बाळतकर, मॅनेजींग डायरेक्टर अनिल कुलकर्णी, रेवणसिध्दप्पा उर्फ अनिल जवळगी, लक्ष्मण सोनकांबळे, रवि पाटील, दत्ता पाटील, औदुंबर गाफने, शांता बळवतकर (सर्व रा. कलबुर्गी) सिध्दाराम पांढरे रा. जुळे सोलापूर अशा 9 जणांविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.

या प्रकरणी रविकांत विठ्ठल भालेराव (वय 37 रा. कोनार्क नगर, जुळे सोलापूर, सध्या रा. तुलसी अपार्टमेंट, विजापूर रोड) यांनी सदर बझार पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

रविकांत भालेराव यांचा कृषी समृध्दी अ‍ॅग्रोटेक फर्म या नावाने खत विक्री करण्याचा व्यवसाय आहे. वरील संशयित आरोपी भालेराव यांच्या घरी आले. महाराष्ट्रात खत विक्रीच्या व्यवसायात अडचणी आहेत, आपण कलबुर्गीत कंपनी काढू असे त्यांनी भालेराव यांना अमिष दाखवले. त्यानंतर रविकांत भालेराव यांनी 29 लाख 19 हजार रूपये आपल्या खात्यातून पाठवून गुंतवणूक केली. त्यानंतर सन 2014 ते 2018 पर्यंत कंपनीला झालेला फायदा व केलेली गुंतवणूक असे मिळून भालेराव यांचे 47 लाख कंपनीकडे असल्याने भालेराव यांनी याबाबत संचालकांकडे पैश्याची मागणी केली. परंतु त्यांनी पैसे परत दिले नाहीत. त्यामुळे नऊजणांवर पैश्याचे आमिष दाखवून कंपनीत गुंतवणूक करण्यास भाग पाडले. तसेच भालेराव यांची 47 लाखाची फसवणूक केली, असा गुन्हा दाखल झाला. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक कांबळे हे करीत आहेत.

Back to top button