सांगोला- पंढरपूर रस्त्यावर कार-ट्रकच्या धडकेत दोन तरुण ठार | पुढारी

सांगोला- पंढरपूर रस्त्यावर कार-ट्रकच्या धडकेत दोन तरुण ठार

सांगोला : पुढारी वृत्तसेवा : सांगोला- पंढरपूर रस्त्यावर खर्डी, मठवस्ती (ता. पंढरपूर) येथे कार व ट्रकची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोन तरुण ठार झाले. ही दुर्घटना आज (दि.१७) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली. सुशांत सुभाष केदार (वय २२) व शनिदेव प्रकाश केदार (वय २०, रा. केदारवाडी वासुद, ता. सांगोला) अशी मृत तरुणांची नावे आहेत. केदारवाडी येथे शोककळा पसरली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, आज दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास पंढरपूरहुन कारने (क्रमांक एम एच ४५ एन . ५७०४) सुशांत केदार व शनिदेव केदार हे दोघेजण सांगोलाकडे येत होते. यावेळी मठवस्ती येथे समोरून येणाऱ्या ट्रकने त्यांच्या कारला जोराची धडक दिली. या अपघातात सुशांत केदार व शनिदेव केदार ठार झाले.दोघेही शेजारी शेजारी राहत होते. त्याच्या अपघाती निधनामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

हेही वाचलंत का ?

Back to top button