मराठा समाजाच्या मागण्या मान्य करू : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | पुढारी

मराठा समाजाच्या मागण्या मान्य करू : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

सोलापूर; पुढारी वृत्तसेवा :  आषाढी एकादशी एकादशीनिमित्त सोलापूर दौर्‍यावर आलेले महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सोलापूर विमानतळावर सकल मराठा समाज सोलापूर जिल्ह्याच्यावतीने सत्कार करण्यात आला.

यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, युवराज छत्रपती संभाजीराजे यांनी आझाद मैदानावर केलेल्या उपोषणाद्वारे मराठा समाजाच्या सर्व प्रलंबित मागण्या हे सरकार मार्गी लावणार असून त्याकरिता तुम्ही मुंबईला येऊन भेटा, असे आवाहन मुख्यमंत्री यांनी केले. सोलापूर शहरामध्ये मुलींचे होस्टेल, वसतिगृह, मराठा भवन, विविध सांस्कृतिक शैक्षणिक या उपक्रमांसाठी प्रलंबित असलेला शासकीय भूखंडाचा प्रश्‍न लवकरात लवकर मार्गी लावू, असे आश्‍वासन मुख्यमंत्री यांनी यावेळी दिले.

सारथी प्रशिक्षण संस्था पूर्ण क्षमतेने चालू असेल. अण्णासाहेब पाटील महामंडळाला यापुढे कधीही निधी कमी पडू दिला जाणार नाही, असेही यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले.  यावेळी सकल मराठा समाजाचे मार्गदर्शक माऊली पवार, राजन जाधव, प्रा. गणेश देशमुख, दत्ता मुळे, विठ्ठल शिंदे उपस्थित होते.

Back to top button