पंढरपूर : आंघोळीस गेलेल्या वारकर्‍याचा 45 हजारांचा ऐवज लंपास | पुढारी

पंढरपूर : आंघोळीस गेलेल्या वारकर्‍याचा 45 हजारांचा ऐवज लंपास

सोलापूर; पुढारी वृत्तसेवा :  आषाढी एकादशीसाठी पंढरपूर येथे आल्यानंतर चंद्रभागा नदीमध्ये आंघोळीसाठी गेलेल्या तरुण वारकरी व त्याच्या कुटुंबीयांचा 45 हजार रुपयांचा ऐवज चोरट्याने चोरुन नेला. याबाबत प्रशांत लक्ष्मीकांत देशमुख (वय 32, रा. पेडगाव, जि. परभणी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आषाढी एकादशीसाठी प्रशांत देशमुख व त्यांचे कुटुंबीय हे पंढरपूर येथे आलेले आहेत. शनिवारी सकाळी 9 च्या सुमारास चंद्रभागा नदीवरील दगडी पुलाजवळील बंधार्‍याच्या अलीकडे ते व त्यांच्या घरातील सर्वजण हे त्यांच्या मालकीचे साहित्य नदीकाठावर ठेऊन नदीमध्ये आंघोळीसाठी गेले होते. त्यावेळी चोरट्याने देशमुख यांचे सर्व साहित्य चोरून नेले.

चोरट्याने रोख 25 हजार, दोन मोबाईल, चारचाकी कारची चावी, घड्याळ, देशमुख यांच्या पत्नीचे आधारकार्ड, पॅनकार्ड, लेडीज पर्स असा ऐवज चोरून नेल्याची नोंद पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. पोलिस नाईक पठाण पुढील तपास करीत आहेत.

Back to top button