सोलापूर : दुकान फोडून 90 हजारांचा माल चोरला | पुढारी

सोलापूर : दुकान फोडून 90 हजारांचा माल चोरला

सोलापूर; पुढारी वृत्तसेवा : जोडभावी पेठेतील हैनाळकर चौकातील हिंगलाज मोबाईल शॉपी नावाचे दुकान फोडून चोरट्याने 90 हजार 500 रुपयांचे मोबाईल चोरून नेले. याबाबत कृष्णा सुदर्शन संदुपटला (वय 33, रा. सुजातानगर, जुना विडी घरकुल, सोलापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जोडभावी पेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हैनाळकर चौकात कृष्णा संदुपटला याचे हिंगलाज मोबाईल शॉपी नावाचे दुकान आहे. शनिवारी सकाळी संदुपटला हे दुकान उघडण्यास आले असता त्यांना दुकानात चोरी झाल्याचे दिसून आले.

संदुपटला यांच्या दुकानाचे शटर उचकटून चोरट्याने दुकानात प्रवेश करून दुकानातून विविध कंपन्यांचे 90 हजार 500 रुपयांचे मोबाईल चोरून नेले, अशी नोंद जोडभावी पेठ पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

 

Back to top button