सोलापूर : मनपा भांडारातील साहित्यांची हेळसांड | पुढारी

सोलापूर : मनपा भांडारातील साहित्यांची हेळसांड

सोलापूर; पुढारी वृत्तसेवा : महापालिकेच्या भांडार विभागात बंदिस्त शेड नसल्याने येथील अनेक साहित्यांची हेळसांड पर्यायाने नुकसान होत आहे.

महापालिकेच्या मुख्यालयामागे गत अनेक वर्षांपासून भांडार विभाग आहे. याठिकाणी महापालिकेच्या विविध साहित्यांबरोबरच अतिक्रमण कारवाईत जप्त केलेले साहित्य ठेवण्यात येते. भांडारात बंदिस्त शेडची सोय नसल्याने खुल्या जागेतच हे साहित्य ठेवण्यात येते. ऊन व पावसात येथे लाखो रुपयांचे साहित्य पडून असल्याचे चित्र पाहावयास मिळते. महापालिकेच्या वापरात नसलेली अनेक वाहने येथे धूळखात पडून आहेत. कोरोना कालावधीत शहरभरात हँडवॉशसाठी आणलेले स्टीलचे बेसिनही सध्या याठिकाणी उघड्यावर पडून आहेत.

महापालिकेच्या मालकीचे विविध साहित्य या भांडारात उघड्यावर ठेवल्यामुळे त्याचे नुकसान होत आहे.
हे साहित्य सुरक्षितपणे ठेवण्याची सोयच याठिकाणी नाही. त्यामुळे मनपाच्या साहित्यांची हेळसांडबरोबरच नासधूस होत आहे. ही बाब लक्षात घेता या साहित्याच्या सुरक्षिततेसाठी बंदिस्त शेड उभारण्यची गरज आहे.

Back to top button