सोलापूर : अमली पदार्थ विरोधी दिन; पोलिस ठाण्यांकडून रॅली | पुढारी

सोलापूर : अमली पदार्थ विरोधी दिन; पोलिस ठाण्यांकडून रॅली

सोलापूर ; पुढारी वृत्तसेवा : अमली पदार्थ विरोधी दिन व व कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने सोलापूर शहर पोलिस आयुक्तालयातील विविध पोलिस ठाण्यांच्या वतीने हद्दीमध्ये रूट मार्च व जनजागृतीपर रॅली काढण्यात आली.

फौजदार चावडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत छत्रपती संभाजी महाराज चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, बालीवेस, दत्त चौक, विजापूर वेस, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, दमानीनगर, वसंत विहार या भागातून रॅली काढण्यात आले. सदर रॅलीमध्ये मा. सहा. पोलिस आयुक्त श्री. संतोष गायकवाड, वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्री उदयसिंह पाटील, क्यू आर टी, पोलिस ठाणेचे कर्मचारी असे मिळून एकूण 07 पोलिस अधिकारी व 55 कर्मचारी उपस्थित होते.

सदर बझार पोलिस ठाणे

सदर बझार पोलीस स्टेशन आणि हरिभाई देवकरण प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय अमली पदार्थ दिनानिमित्त रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये सर्व अधिकारी व अंमलदार सहभागी झाले होते. सदर रॅलीस आरसीपी क्यूआरटी पोलिस ठाण्याकडील अधिकारी कर्मचारी हरिभाई देवकरण प्रशालेत कडील प्राचार्य शिक्षक विद्यार्थी व विद्यार्थिनी सहभागी झाले होते सदरचे रॅली रंगभवन सात रस्ता परत हरिभाई देवकर प्रशाला येथे समाप्त झाली

विजापूर नाका पोलिस ठाणे

विजापूर नाका पोलिस ठाणे तसेच भारती विद्यापीठ शाळेचे ( 3 शिक्षक 250 विद्यार्थी) आरसीपी व क्युआरटी चे कर्मचारी तसेच वाहतूक शाखेकडील पोलिस निरीक्षक विश्वनाथ सिद व 01 अधिकारी , 2 अंमलदार असे मिळून अंमली पदार्थ विरोधी जन जागृती रॅली काढण्यात आली . सदरची जनजागृती रॅलीची सुरुवात भारती विद्यापीठ येथून करून पुढे दावत चौक – गोविंद श्री मंगल कार्यालय चौक – डी मार्ट चौक – आयएमएस कॉर्नर चौक – कुमठेकर हॉस्पिटल – बनशंकरी चौक – शिवदारे कॉलेज – दावत चौक ते परत भारती विद्यापीठ अशी काढण्यात आली.

एमआयडीसी पोलिस ठाणे

एमआयडीसी पोलिस स्टेशन आणिएस व्ही सी एस प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय तसेच नेताजी प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय अमली पदार्थ विरोधी जनजागृती सप्ताहनिमित्त व्याख्यान आयोजित केले होते. सदर कार्यक्रमास पोलिस ठाण्याकडील वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजन मान, तसेच पोलीस उपनिरीक्षक वळसंगे व एस व्ही सी एस प्रशाला तसेच नेताजी प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय कडील शिक्षक व प्राचार्य उपस्थित होते.े यावेळी विद्यार्थी यांना मार्गदर्शन केले.

Back to top button