

सोलापूर, पुढारी वृत्तसेवा : येथील मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालयाची निवडणूक अविरोध करण्यासाठी सत्ताधारी गटाने गुरुवारी बैठक घेतली. यामध्ये काही उमेदवारांनी अर्ज माघारीची तयारी दर्शविली. दरम्यान, सत्ताधारी पॅनेल निश्चितीचे सर्वाधिकार ज्येष्ठ सहकार नेते तथा रुग्णालयाचे प्रेसिडेंट सत्यनारायण बोल्ली यांना देण्यात आले असून, ते शुक्रवारी उमेदवारांच्या मुलाखती घेणार आहेत.
रुग्णालयाचे चेअरमन डॉ. माणिक गुर्रम यांनी दाजी पेठेतील व्यंकटेश्वर सांस्कृतिक भवनामध्ये निवडणुकीसाठी अर्ज भरलेल्या सर्व उमेदवारांची बैठक बोलाविली होती. यावेळी पद्मशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष सुरेश फलमारी, रुग्णालयाचे संचालक डॉ. विजयकुमार आरकाल, आनंद चंदनशिवे, लक्ष्मण चिंताकिंदी, अशोक इंदापुरे, पांडुरंग दिड्डी यांच्यासह उमेदवारी अर्ज भरलेले 90 जण उपस्थित होते. यावेळी डॉ. गुर्रम यांनी निवडणूक अविरोध करणे गरजेचे असल्याचे सांगत यासाठी सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली. यावर 15 जणांनी माघार घेण्याची तयारी दर्शविली. चर्चेअंती सत्ताधारी पॅनेलच्या उमेदवार निवडीचे अधिकार सत्यनारायण बोल्ली यांना देण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. यानुसार बोल्ली हे शुक्रवारी (दि. 1) रोजी रुग्णालयात दुपारी एक ते सायंकाळी सात यावेळेत उमेदवारांच्या मुलाखती घेणार आहेत.
बैठकीस श्रीहरी विडप, लक्ष्मीनारायण कुचन, विनायक कोंड्याल, श्रीनिवास कमटम, अशोक जैन, अशोक आडम, श्रीनिवास कमटम, सिद्राम कोनापुरे, डॉ. लता मिठ्ठाकोल, सरिता वडनाल, राजेशम येमूल, श्रीनिवास कोंडी, गणेश गुज्जा, गणेश पेनगोंडा, नरसय्या वडनाल आदी उपस्थित होते.