बार्शीत दोघांकडून पोलिसाला मारहाण | पुढारी

बार्शीत दोघांकडून पोलिसाला मारहाण

बार्शी :  पुढारी वृत्तसेवा :  सुभाषनगर येथील रोटरी क्लबच्या पाठीमागे मद्यपी दारू पिऊन लोकांना शिवीगाळ करत गोंधळ घालत होते. याची माहिती मिळाल्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यासाठी गेलेल्या पोलिसाला एकाने हाताने मारले तर सहायक पोलिस निरीक्षकाला धक्‍का देत ढकलून दिल्याचा प्रकार बार्शीत घडला. याप्रकरणी रोहित बाळू शिंदे व वैभव जाधव दोघे (रा. सुभाषनगर, बार्शी ) या दोघा संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

रोटरी क्लबच्या पाठीमागे काही लोक दारू पिऊन गोंधळ घालत आहेत व आरडाओरडा करून अर्वाच्य शिवीगाळ करत आहेत, अशी माहिती मिळाल्यानंतर पोलिस महेश माने व सहायक पोलिस निरीक्षक शिरसट त्या ठिकाणी गेले. तेथे रोहित शिंदे व त्याचा साथीदार वैभव जाधव लोकांना शिवीगाळ करून गोंधळ घालत होत.

तुम्ही गोंधळ का घालत आहात, असे त्या दोघांना विचारले असता रोहित याने मला विचारणारे तुम्ही कोण आहात, असे पोलिसांना विचारले. त्यांना पोलिस असल्याचे सांगितले असता त्याने मी पोलिसांच्या बापाला घाबरत नाही. तुम्ही इथून निघून जा. आम्ही येथे गोंधळ करणारच, असे म्हणून शिवीगाळ करु लागला. त्यावेळी पोलिस माने यांनी त्याच्याजवळ जाऊन त्याला ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत असताना त्याने माने यांना धक्का मारुन डोक्यात डाव्या बाजूस हाताने जोरात मारले. त्यामध्ये त्याच्या हातातील स्टीलचे कडे लागले. दरम्यान, सपोनि शिरसाट यांनी धावत येऊन त्यास पकडण्याचा प्रयत्न केला असता मद्यपीचा मित्र वैभव याने शिरसाट यांना ढकलून दिले व शिवीगाळ करु लागला.

दरम्यान, वैभव जाधव हा तेथून निसटून पळून गेला. रोहित शिंदे यास ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी पोलिस महेश संजय माने यांच्या फिर्यादीवरून दोन्ही संशयित आरोपींविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा नोंद झाला आहे.

करु लागला. त्यावेळी पोलिस माने यांनी त्याच्याजवळ जाऊन त्याला ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत असताना त्याने माने यांना धक्का मारुन डोक्यात डाव्या बाजूस हाताने जोरात मारले. त्यामध्ये त्याच्या हातातील स्टीलचे कडे लागले. दरम्यान, सपोनि शिरसाट यांनी धावत येऊन त्यास पकडण्याचा प्रयत्न केला असता मद्यपीचा मित्र वैभव याने शिरसाट यांना ढकलून दिले व शिवीगाळ करु लागला. दरम्यान, वैभव जाधव हा तेथून निसटून पळून गेला. रोहित शिंदे यास ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी पोलिस महेश संजय माने यांच्या फिर्यादीवरून दोन्ही संशयित आरोपींविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा नोंद झाला आहे.

Back to top button