रुक्मिणी मातेच्या चरणावर वज्रलेपाची प्रक्रिया पूर्ण | पुढारी

रुक्मिणी मातेच्या चरणावर वज्रलेपाची प्रक्रिया पूर्ण

पंढरपूर : पुढारी वृत्तसेवा :  श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात रुक्मिणी मातेच्या चरणाची झीज झाल्यामुळे त्यावर वज्रलेपनाची प्रक्रिया करण्यात आली. यामुळे दोन दिवस श्री रुक्मिणी मातेचे नित्योपचार आणि पदस्पर्शदर्शन बंद राहणार आहे. बुधवारपासून रुक्मिणी मातेच्या चरणाचे दर्शन भाविकाना घेता येणार आहे. दरम्यान, रुक्मिणी मातेच्या चरणावर शनिवारी रात्री तीन तास वज्रलेपन करण्यात आले. रविवारी दुपानंतर वज्रलेप प्रक्रिया पूर्ण झाली.

श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या चरणावर भक्‍तांकडून डोके टेकल्यामुळे व हाताने चरणस्पर्श केल्यामुळे चरणाची झीज होत असल्याचे निरीक्षण पुरातत्त्व विभागाने नोंदविले होते. त्याचबरोबर श्रींच्या गाभार्‍यातील ग्रॅनाइटच्या फरशा, दही-दुधाचा अभिषेक, लख्ख प्रकाशाचे बल्बही मूर्तीची झीज होण्यास कारणीभूत ठरत असल्याचा अहवाल नोंदविला होता. यावर उपाय म्हणून पुरातत्त्व विभागाने रुक्मिणी मातेच्या चरणावर वज्रलेप करण्याची सूचना केली होती. त्यानुसार मंदिर समितीने शासनाकडे अहवाल पाठवून मूर्तीवर वज्रलेप करण्यास परवानगी मागितली होती. मंदिर समितीने पुरातत्त्व विभागाला पाचारण करत
वज्रलेप करण्यास पाचारण करण्यात आले.

पुरातत्व विभागाचे संचालक श्रीकांत मिश्रा व त्यांच्या टिमने शनिवारी रात्री 11 पासून तीन तास काम केले. यावेळी त्यांनी रुक्मिणी मातेची खराब झालेली पावले काढून नवीन पावले बसवण्यासाठी मोजमापे घेवून काम थांबवले. रविवारी सकाळपासून दुपारी 2 वाजेपर्यंत वज्रलेपनाचे काम सुरु होते. श्री रुक्मिणी मातेच्या चरणावर इफोक्सी सिलिकॉन लेप करण्यात आले आहे. या लेपनानंतर पुढील दोन दिवस श्री रुक्मिणीमातेचे नित्योपचार आणि पदस्पर्शदर्शन बंद राहणार असल्याचे पुरातत्त्व विभागाचे श्रीकांत मिश्रा आणि मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले.

वज्रलेपाचे काम सुरु असल्यामुळे भाविकांना रविवारी सकाळपासून गाभार्‍यातूनच दर्शन देण्यात येत होते. भाविकांना दर्शन मिळावे म्हणून रुक्मिणी मातेच्या पायाजवळ चांदीची पावले बसवण्यात आली होती.

रुक्मिणी मातेची मूर्ती शालिग्राम दगडाची आहे. या मूर्तीवर वज्रलेप दोन ते चार वर्षेच टिकतो. सध्या इफोक्सीचे सिलिकॉन लेपन करण्यात आले आहे. पदस्पर्श दर्शन, मूर्तीवर होणारे नित्योपचार पाणी, दही, दूध, मध याचे अभिषेक यांचे प्रमाण मंदिर समितीने कमी करून नित्योपचार करावेत. सध्या रुक्मिणी मातेच्या चरणावर केलेला वज्रलेप जास्त दिवस राहील. मंदिर समितीच्या कर्मचारी, पुजारी व्यक्‍तीने रुक्मिणी मातेच्या चरणाला कोणत्याही प्रकारची इजा, धका लागू नये, याची काळजी घ्यायची आहे.
– श्रीकांत मिश्रा, भारतीय पुरातत्त्व विभाग, औरंगाबाद

Back to top button